Homeताज्या बातम्यामनोरंजन

हार पचवू शकली नाही अंकिता लोखंडे स्पष्ट दिसला रडवेला चेहरा

मुंबई- 'बिग बॉस सीझन १७' चा महाअंतिम सोहळा २८ जानेवारीला पार पडला. यंदा बिग बॉसच्या ट्रॉफीवर मुनव्वर फारुकीचे नाव कोरले गेले. मुनव्वरने ट्रॉफीसोब

अंकिता लोखंडेने सासुरवाडीत साजरं केलं पहिलं रक्षाबंधन.
अंकिता लोखंडेने अखेर प्रग्नेंसींच्या चर्चांवर सोडलं मौन
अंकिता लोखंडे ठरली बिग बॉसची सर्वात महागडी स्पर्धक

मुंबई– ‘बिग बॉस सीझन १७’ चा महाअंतिम सोहळा २८ जानेवारीला पार पडला. यंदा बिग बॉसच्या ट्रॉफीवर मुनव्वर फारुकीचे नाव कोरले गेले. मुनव्वरने ट्रॉफीसोबतच ५० लाख रुपयांची मोठी बक्षीस रक्कम आणि ब्रॅण्ड न्यू महागडी गाडीही जिंकली. अभिनेत्री अंकिता लोखंडे विजेती नाहीतर टॉप २ पर्यंत तरी नक्कीच पोहोचेल असा तिच्या चाहत्यांना विश्वास होता. मात्र तसे झाले नाही. आणि तिला टॉप ४ पर्यंतच समाधान मानावे लागले. शोमधून बाहेर पडल्यानंतर अंकिताचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा पार उतरलेला दिसतो.विजेत्याची घोषणा झाल्यानंतर सर्व स्पर्धक मीडियाशी बोलताना किंवा पार्टीसाठी निघताना दिसले. मात्र अंकिता लोखंडे फारच अस्वस्थ आणि थकलेली दिसली. ती आपल्या कारमधून उतरुन थेट तिच्या व्हॅनिटीमध्ये गेली. तिच्यासोबत तिची आईदेखील होती. दोघीही व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना मीडियाला टाळताना दिसले.अंकिता लोखंडेबद्दल लोक काय म्हणाले? अंकिता लोखंडेचा बिग बॉसच्या सेटवरून बाहेर पडण्याचा व्हिडिओ अनेक इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी अंकितावर प्रेमाचा वर्षाव केला तर काहींच्या मते अंकिता तिची हार पचवता आली नाही असे म्हटले. काहींनी म्हटले की अंकिता तिच जिंकेल अशी खात्री होती मात्र तसे न झाल्यामुळे ती निराश झाली आहे.अंकिता आणि विकीचा डान्स अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह बीबी१७ च्या घरात स्पर्धक म्हणून प्रवेश केला आणि ते दोघेही सीझनच्या शेवटपर्यंत एकत्र राहिले, मात्र दोघांपैकी कोणीही जिंकू शकले नाही. महाअंतिम सोहळ्यात अंकिता आणि विकीने त्यांच्या चाहत्यांसाठी रोमँटिक डान्स केला.

COMMENTS