Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वजीराबाद पोलिसाकडून गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ

नांदेड प्रतिनिधी - आदिवासी कोळी महादेव या जमातीच्या लोकांना जाती प्रमाणपत्र मिळावेत व आरक्षणाचे लाभ प्राप्त व्हावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी का

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींच्या मागण्यांसाठी आंदोलन
मावळ लोकसभेसाठी फेर मतदान व्हावे : श्रीरंग बारणे यांची मागणी
शेततळ्यात उडी मारुन शिपायाची आत्महत्या

नांदेड प्रतिनिधी – आदिवासी कोळी महादेव या जमातीच्या लोकांना जाती प्रमाणपत्र मिळावेत व आरक्षणाचे लाभ प्राप्त व्हावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड च्या समोर आदिवासी कोळी कर्मचारी विकास परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गोणारे त्यांच्या नेतृत्वात दि. 10 एप्रिल 23 पासून सत्याग्रह गेल्या बारा दिवसापासून सुरू आहे. या ठिकाणी मंडपही टाकण्यात आला आहे . ग्रामीण भागातील महिला -पुरुष मोठ्या संख्येने सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी  आवर्जून उपस्थित राहत आहेत.
दि. 21 एप्रिल 23 रोजी सत्याग्रहामध्ये सहभागी श्रीमती राजाबाई मोरे या महिलेला उष्माघात झाल्याने ती चक्कर येऊन सत्याग्रह ठिकाणी पडले असता म्बुलन्स येईपर्यंत त्यांना  जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील वातानुकूलित दालनासमोर  हलवण्याचा प्रयत्न सत्याग्रह करणारे काही महिलांच्यावतीने करण्यात आला.    सदर वेळी सत्याग्रहामध्ये सहभागी  प्रकाश उत्तम सादलवाड नावाचा आदिवासी कोळी महादेव जमातीचा युवक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित असताना त्या ठिकाणी नांदेड पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असणारे परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात त्यावेळी कर्तव्यावर असलेली महिला पोलीस कर्मचारी  यांनी या युवकाच्या गालावर रागारागाने दोन थापडा मारून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली असे वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल आहे. यानंतर सदरील युवकाने पोलीस स्टेशन वजीराबाद येथे लेखी फिर्याद देण्यासाठी दुपारी तीन वाजे दरम्यान गेले असता त्या तक्रारीची पोच पावती देण्यात आली व गुन्हा दाखल करण्याबाबत टाळाटाळ करण्यात आले व दोन घंटे पोलीस स्टेशन येथे या युगास ताटकळत बसून ठेवण्यात आले. त्यानंतर पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस कर्मचारी श्रीमती आशा बिकलवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात मधून पोलीस स्टेशन येथे बोलवण्यात आले व त्यांच्याकडून लेखी तक्रार प्राप्त करून घेऊन मूळ फिर्यादी व सत्याग्रह करणारे यांच्या विरुद्ध प्रशासकीय कामात अडथळा निर्माण केला असे खोटे मजकुरावर  गुन्हा दाखल करण्यात आला. या आशयाची फिर्याद नागरिक शोषण कार्यालय यांच्याकडे करण्यात आली असल्याचे समजते. यानंतर पीडित युवक प्रकाश उत्तम सादलवाड यांनी आज रोजी पोलीस स्टेशन वजीराबाद येथे एक नव्याने तक्रार देऊन दिनांक 21 एप्रिल 2023 चा फिर्याद अर्ज व त्या अनुषंगाने झालेला  गुन्ह्याची तीव्रता कमी करणारे संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व ठाणे अंमलदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची लेखी फिर्याद दिलेली आहे. याच वजीराबाद पोलीस स्थानकात दिली असून त्याच्याप्रती उपविभागीय पोलीस अधिकारी वजीराबाद तसेच  पोलीस अधीक्षक व  जिल्हाधिकारी यांनासुद्धा प्रति पाठवलेले असून महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे सदरील युवकाने ईमेल द्वारा तक्रार पाठवून त्या तक्रारी सोबत सदरील महिला पोलीस कर्मचारी यांनी या युवकास गालावर ज्या थापडा मारल्या व मोबाईल घेतला याबाबतचे व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा पाठवलेले आहेत. सदरील पोलीस स्टेशनच्या वतीने आरोपी महिला पोलीस कर्मचारी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न गैरकायदेशीर षड्यंत्र रचून करण्यात आला असल्याचा आरोप या युवकाने केलेला आहे.

COMMENTS