मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सरकारची भूमिका स्पष्ट करताना मराठा आरक्षण, नागपूरमधील पूरपरिस्थिती
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सरकारची भूमिका स्पष्ट करताना मराठा आरक्षण, नागपूरमधील पूरपरिस्थिती, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि विरोधकांच्या टीकेसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मराठा समाजाच्या हितासाठी महायुती सरकारने यापूर्वी कोणत्याही सरकारने न घेतलेले मोठे निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या मनात काही शंका असतील, तर त्या चर्चेतून दूर करण्याची सरकारची पूर्ण तयारी असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
विद्यार्थ्यांच्या विविध आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केला. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश गृह विभाग आणि पोलीस यंत्रणेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आंदोलनाच्या काळात पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुसरीकडे, नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून बाधित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

COMMENTS