मुंबईत आजपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा होणार सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत आजपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा होणार सुरू

मुंबई : कोरोना आणि ओमायक्रॉनच्या सावटामुळे बंद असलेल्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा बुधवार, 15 डिसेंबरपासून सुरू करण्यास मुंबई महापालिकेने हिरवा कं

लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सीईओंचे निर्देश 
मणिपूर हिंसाचाराची सीबीआय चौकशी
टिटवी येथे बंजारा परंपरेतील तीज सण उत्साहात 

मुंबई : कोरोना आणि ओमायक्रॉनच्या सावटामुळे बंद असलेल्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा बुधवार, 15 डिसेंबरपासून सुरू करण्यास मुंबई महापालिकेने हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी तशा लेखी सूचना दिल्या आहेत.
तडवी यांनी सांगितले की, महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या मान्यतेनुसार, 15 डिसेंबरपासून संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा सुरू करत आहोत. तसे लेखी आदेश देण्यात आले आहेत. कोव्हिड नियमांबाबतचे परिपत्रकही शाळांना देण्यात आले आहेत. त्या संबंधित कार्यवाही ही शाळांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईतील पालकांनी आणि शाळांनी आता कुठल्याही संभ्रमात राहायची गरज नाही, असे आवाहनही केले आहे. 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करा, हे याआधीच शाळांना सूचित केले होते. मात्र तरीदेखील काही शाळांनी आजतागायत पाल्याला शाळेत पाठविण्याविषयी पालकांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. ही बाब गंभीर असून पुन्हा नव्याने सूचना देण्यात येतील, असेही तडवी म्हणाले. दरम्यान महामुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय डावरे यांनी प्रतिक्रिया दिली की, शिक्षण विभागाचे निर्णय हे आयत्या वेळी केव्हाही बदलतात किंवा एक दिवस आधी नव्या सूचना येऊन धडकतात. त्यामुळे काही शाळांनी ’’वेट ऍण्ड वॉच’’ची भूमिका घेतली असावी. मुंबईत मागील काही दिवस संचारबंदीसारखे आदेश लागू होत असल्याने पालकांच्या मनातही ओमायक्रॉनविषयी भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

COMMENTS