Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उत्तर प्रदेशातून दोन अल्पवयीन चुलत बहिणींची सुटका; चकलांबा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

चकलांबा: बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्तर प्रदेशातील सिकंदरपूर येथून दोन अल्पवयीन चुलत बहिणींना सुखरूप सोडवून एक मोठे यश मिळ

जमिनीच्या वादातून उमापूरमध्ये शेतकर्‍याचे कडबा गांजी व टायर जाळले; वाहनांची तोडफोड, लाखोंचे नुकसानचकलंबा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल; अ‍ॅट्रॉसिटीची धमकी दिल्याचा आरोपकारवाई न झाल्यास सोमवारी शेख कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा
बीडमध्ये ऊसतोड कामगाराचे अपहरण
आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी आ. संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीद ग्रेट टिपू सुलतान युवा मंचचे पोलीस अधीक्षकांना निवेदन; बशीरगंजमध्ये टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक करून निषेध


चकलांबा: बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्तर प्रदेशातील सिकंदरपूर येथून दोन अल्पवयीन चुलत बहिणींना सुखरूप सोडवून एक मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणी आरोपी विजय महादेव काळे याला अटक करण्यात आली असून, ही कारवाई चार दिवसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर यशस्वी झाली.
5 एप्रिल 2026 रोजी उमापूर (ता. चकलांबा) येथून दोन अल्पवयीन मुलींना आरोपीने पळवून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 102/2026, कलम 137(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तपासादरम्यान आरोपी पूर्वी भिवंडी येथे काम करत असल्याची माहिती समोर आली. मात्र, तेथे शोध घेतल्यावर आरोपी आणि मुलींचा ठावठिकाणा लागला नाही. पुढे तांत्रिक तपासाच्या आधारे मुली बिहार-उत्तर प्रदेश सीमेवर असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांचे विशेष पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. बलिया जिल्ह्यातील शिवपूर दियार येथे शोधमोहीम राबवण्यात आली, परंतु आरोपी सिकंदरपूर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकण्यात आला. या कारवाईत प्रथम आरोपी विजय काळे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौकशीतून दोन्ही अल्पवयीन मुली सुरक्षित अवस्थेत सापडल्या. आरोपी त्यांना घेऊन छत्तीसगडमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचेही उघड झाले. या संपूर्ण मोहिमेत चकलांबा पोलिसांनी सलग चार दिवस प्रवास करून ही धाडसी कारवाई यशस्वी केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस हवालदार कृष्णा पवार, पोलीस अंमलदार हनुमान इंगोले तसेच तांत्रिक पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे आणि पोलीस अंमलदार विकी सुरवसे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

COMMENTS