Homeताज्या बातम्या

आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी आ. संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीद ग्रेट टिपू सुलतान युवा मंचचे पोलीस अधीक्षकांना निवेदन; बशीरगंजमध्ये टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक करून निषेध

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथे आयोजित सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी हजरत टिपू सुलतान यांच्या संदर्भ

चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त; वाळू माफिया बाळू खेडकरविरुद्ध गुन्हा
ब्रम्हगाव प्रकरणातील मागण्या मान्य; भिमाशंकर यादव यांचे उपोषण स्थगितडॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या मध्यस्थीने पोलीस प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा
चकलांब्यात अन्न भेसळीचा आरोप; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्षतुकाराम मुंढे साहेब, चकलांब्यातही धडक मोहीम राबवा – नागरिकांची मागणी



बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथे आयोजित सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी हजरत टिपू सुलतान यांच्या संदर्भात कथित आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी द ग्रेट टिपू सुलतान युवा मंच महाराष्ट्र राज्यच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक, बीड यांना निवेदन देऊन निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
द ग्रेट टिपू सुलतान युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष इम्रान इनामदार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हजरत टिपू सुलतान हे भारतीय इतिहासातील शूर योद्धा व स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संदर्भात अपमानास्पद किंवा समाजातील धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्यास सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सभेतील व्हिडिओ रेकॉर्डिंग, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व उपलब्ध पुरावे तपासण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. चौकशीत दोष आढळल्यास भारतीय न्याय संहिता (इछड) 2023 मधील संबंधित कलमांनुसार तसेच धार्मिक भावना दुखावणे व समाजात तेढ निर्माण करण्यासंदर्भातील कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, द ग्रेट टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने बीड शहरातील बशीरगंज भागात हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक करून आ. संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाशी संबंधित बीड जिल्हाध्यक्ष शफीक भाऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते खुर्शिद आलम, उमापूर येथील सय्यद इमाम कादरी, फिरोज कुरेशी, द ग्रेट टिपू सुलतान युवा मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी तसेच बीड जिल्ह्यात सामाजिक शांतता व सलोखा कायम ठेवण्यासाठी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी उपस्थितांनी केली आहे.

COMMENTS