बीड : बीड येथील पोक्सो प्रकरणात आरोपीस बीड सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या निकालामध्ये अॅड. दीपक ससाणे यांच्या प्रभावी व कायद

बीड : बीड येथील पोक्सो प्रकरणात आरोपीस बीड सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या निकालामध्ये अॅड. दीपक ससाणे यांच्या प्रभावी व कायदेशीर युक्तिवादाची निर्णायक भूमिका ठरल्याचे समोर आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रतीक प्रमोद धर्माधिकारी यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 294, पोक्सो कायदा 2012 अंतर्गत कलम 13 व 14 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत कलम 67 व 67(बी) अशी गंभीर कलमे लावण्यात आली होती. फिर्यादीत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची नोंद बीड सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. सदर प्रकरणाची जबाबदारी अॅड. दीपक ससाणे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी न्यायालयात तथ्याधारित आणि कायद्याच्या चौकटीत राहून प्रभावी युक्तिवाद सादर केला. तपासातील मुद्दे, पुराव्यांची स्थिती तसेच कायदेशीर बाबी सविस्तरपणे मांडल्याने न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला. या निर्णयानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, बीडमधील कायदेविषयक वर्तुळात अॅड. ससाणे यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. या प्रकरणात अॅड. नामदेव जाधव व अॅड. अजित ओव्हाळ यांनीही सहकार्य केले.अल्पावधीत अनेक प्रकरणांमध्ये यशस्वी युक्तिवादामुळे अॅड. दीपक ससाणे हे बीडमध्ये एक सक्षम आणि विश्वासार्ह वकील म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.

COMMENTS