मनपा लेखाधिकारी मानकरच्या घरातून लाखोंचे घबाड जप्त ; 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपा लेखाधिकारी मानकरच्या घरातून लाखोंचे घबाड जप्त ; 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

अहमदनगर/प्रतिनिधी- महापालिकेच्या ठेकेदाराकडून वीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरच्या पथकाने अटक केलेले नगर महाप

सरण विझलं…राख उरली…अश्रू थिजले…निर्विकार झाली मने…
इंधनाच्या करात कपात व्हावी
‘सांज पाडवा’ सांस्कृतिक वैभव जोपासणारा कार्यक्रम ः थोरात

अहमदनगर/प्रतिनिधी- महापालिकेच्या ठेकेदाराकडून वीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरच्या पथकाने अटक केलेले नगर महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण मानकर याच्या पुणे येथील घरात लाखोंचे घबाड सापडले. दरम्यान, मानकर याला न्यायालयाने 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी (20 ऑक्टोबर) दुपारी मानकर यांना महापालिकेतून अटक केली होती. तक्रारदार ठेकेदाराचे चेक काढण्याच्या मोबदल्यात वीस हजार रुपयांची मागणी मानकर याने केल्याचे लाच पडताळणीमध्ये स्पष्ट झाले होते. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अकरा लाख व अर्धा किलो सोने
गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मानकरच्या पुणे येथील घराची झाडाझडती घेतली. यात मोठे घबाड सापडले. साडेअकरा लाख रुपयांची रोख रक्कम, तब्बल अर्धा किलो (540 ग्रॅम) सोन्याचे दागिने व दीड किलो चांदी लाचलुचपत विभागाच्या पथकाने जप्त केली. या झडतीमध्ये तीन फ्लॅटची कागदपत्रे मिळून आली आहेत. रोख रक्कमेबाबत मानकरच्या पत्नीस वैध कारण न देता आल्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आल्याचे लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी स्पष्ट केले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे या करीत आहेत. मानकर याच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व दागिने सापडल्यामुळे अधिकारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

COMMENTS