Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर सोमवारी सकाळी पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईच्य

छत्तीसगडमध्ये नवरा-नवरीसह 5 जणांचा मृत्यू
उत्तरकाशीत बस दरीत कोसळली, ७ जण ठार तर 28 जण जखमी
अपघातात तरुण गंभीर जखमी; ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर सोमवारी सकाळी पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारा कंटेनर विरुद्ध बाजुच्या लेनवर पलटी झाल्याने पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एका कारचालकासह महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर संबंधित कारमधील इतर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कंटेनर (एमएच-46, एआर 0181) पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर विरुद्ध लेनवर जाऊन पलटी झाला. यावेळी समोरून येणार्‍या इतर पाच वाहने बाधित झाली. यामध्ये एका सुझुकी डिझायर कारचा (एमएच-48, ए 6512) चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कार चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर दोन महिला जखमी झाल्या. दोन्ही जखमी महिलांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या लेनची वाहतूक सेवा विस्कळीत झाली. या मार्गावर संथ गतीने वाहतूक सुरू आहे. अपघातग्रस्त वाहनांना घटनास्थळावरून बाजुला केले जात आहे.

COMMENTS