Homeताज्या बातम्या

टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेची वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. संच

कर्जत तालुक्यातील दुरगाव येथे कौटुंबिक वादातून सावत्र आईला बेदम मारहाण; हात-पाय बांधून जंगलात सोडल्याचा आरोप
कसारपेठेत हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; २५ हजारांचे रसायन नष्ट, गावपातळीवरील जबाबदारांनाही कारवाईचा इशारा
अंजनापूर ग्रामस्थांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार; कोपरगाव येथील ग्रामसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची ग्वाही
Sanchita Ugale Death: धक्कादायक! 'छावा' फेम अभिनेत्री संचिता उगलेनं जीवन  संपवलं, घरात मृतदेह पाहून खळबळ | chhava movie fame actress sanchita ugale  died by suicide at the age of 30

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. संचिता आपल्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आली. अवघ्या ३० व्या वर्षी तिने आपले जीवन संपवल्यामुळे तिचे चाहते आणि सहकलाकारांना मोठा धक्का बसला असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संचिता उगले ही आपल्या पालकांसह आणि बहिणीसह नालासोपारा येथे वास्तव्यास होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटना घडली त्या वेळी ती घरात एकटीच होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

संचिता उगले हिने टीव्ही मालिकांमधून अभिनय क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. लोकप्रिय हिंदी मालिका “कुमकुम भाग्य” मधील तिच्या भूमिकेमुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर “वागळे की दुनिया” या मालिकेतही तिने लक्षवेधी काम केले होते. याशिवाय एका मनोरंजन वाहिनीवरील “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” या मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. मालिकांबरोबरच तिने चित्रपट आणि वेब विश्वातही काम केले होते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या “छावा” या चित्रपटात तिने महाराणी ताराराणी यांच्या बालपणाची भूमिका साकारली होती, तसेच अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या “सायलेन्स २” या चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका निभावली होती. संचिता सोशल मीडियावर खूप सक्रिय होती, तिच्या अशा अचानक जाण्याने चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

COMMENTS