Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींना कोर्टाचा दणका

दोन वर्षांची शिक्षा कायम

नवी दिल्ली प्रतिनिधी - मोदी आडनाव प्रकरणी काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत ट्रायल कोर्टाचा दोषी ठरवले होते. याप्रकरणी गुजरात उच्च न्याया

मंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखाली सार्वजनिक बांधकाम खात्यात संगनमताने भ्र्रष्टाचार सुरु l LokNews24
एसटी चालक, वाहक भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र
राहाता बाजार समितीच्या सभापतीपदी ज्ञानेश्‍वर गोंदकर

नवी दिल्ली प्रतिनिधी – मोदी आडनाव प्रकरणी काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत ट्रायल कोर्टाचा दोषी ठरवले होते. याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्यावर न्यायालयाने सत्र न्यायालयाच आदेश योग्य आहे, या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, त्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘मोदी आडनावाबाबत वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरतच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये फौजदारी मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सुरत सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी अपील करण्यात आले होते.उच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी करताना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आणि उन्हाळी सुट्टीनंतर अंतिम आदेश देऊ असे सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.आता सुरत उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामध्ये न्यायालयाने सत्र न्यायालयाच आदेश योग्य आहे, या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, त्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला. या निकालामुळे राहुल गांधींना मोठा झटका बसला आहे.

COMMENTS