नांदेड : टेन्ट हाऊस, मंगल कार्यालय, केटरर्स व डेकोरेटर्स ओनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या नांदेड दक्षिण तालुका अध्यक्षपदी तुकाराम बापूराव शिंदे (सचिन

नांदेड : टेन्ट हाऊस, मंगल कार्यालय, केटरर्स व डेकोरेटर्स ओनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या नांदेड दक्षिण तालुका अध्यक्षपदी तुकाराम बापूराव शिंदे (सचिन पाटील) यांची निवड करण्यात आली आहे. मागील 25 वर्षांपासून ते टेन्ट व केटरिंग व्यवसायात कार्यरत असून, ते नवीन कौठा परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष दडूशेठ पुरोहित, नांदेड जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी, राज्याचे कोषाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष नेरलकर, गोविंद शुक्ला, अनिल कांबळे, केशव खिचडे आणि अनुराग जाजू यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या निवडीचे व्यावसायिक क्षेत्रासह विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS