Homeताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

संभाजीनगर : राज्यात एफडीएच्या (FDA) धडक कारवाया सुरूच असून तुकाराम मुंढेंच्या आदेशाने अन्न व औषध प्रशासन विभागाने आता आपला मोर्चा राज्यातील बस स्

समृद्धी महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू
बुलडाण्यातील अपघातात एकाचा मृत्यू
काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 8 जणांचा मृत्यू
FDA Raid Sillod ST Stand Canteen: सिल्लोड एसटी कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई;  परवाना निलंबित, कॅन्टीन बंद

संभाजीनगर : राज्यात एफडीएच्या (FDA) धडक कारवाया सुरूच असून तुकाराम मुंढेंच्या आदेशाने अन्न व औषध प्रशासन विभागाने आता आपला मोर्चा राज्यातील बस स्थानकांवर असलेल्या कँटीनकडे वळवल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा आता चायनीज स्टॉलकडे वळवण्यात येईल, असे संकेत दिले होते. त्यानंतर, आता छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar) सिल्लोड एसटी बस डेपोतील कॅन्टीनवर अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. त्यानुसार येथील कँटीनचा परवाना रद्द करत हॉटेल सील करण्यात आलं आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत केलेल्या तपासणीत कॅन्टीनमध्ये अस्वच्छता, अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन आणि आवश्यक नोंदींचा अभाव आढळून आला. कॅन्टीनची फरशी आणि स्वयंपाकघर अस्वच्छ, भिंतींचे पापुद्रे निघालेले, खिडक्यांना जाळ्या नाहीत, तर पाणी तपासणीचा अहवालही उपलब्ध नसल्याचं समोर आलंय. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, ॲप्रोन आणि हातमोजेही नसल्याचं तपासणीत आढळलं. तसेच खरेदीचे अपूर्ण रेकॉर्ड, चणाडाळीच्या साठ्याबाबत नोंदींचा अभाव, साफसफाई आणि कीटक नियंत्रणाचे रेकॉर्ड नसल्याचंही समोर आलं आहे. येथील कँटीनमधअये गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित करत कॅन्टीन बंद केली आहे. सिल्लोडमधील या कारवाईमुळे आता राज्यभरातील बस स्टँडवरील कँटीनवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून धडाकेबाज कारवाई सुरू असून तुकाराम मुंढेंनी संबंधित विभागाच्या आयुक्तपदी पदभार स्वीकारताच कारवायांना वेग आला आहे. त्याच, पार्श्वभूमीवर दूध, पनीरसह अन्न भेसळखोरांवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध, दुग्धजन्य पदार्थ भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावेत. सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणा दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

COMMENTS