Homeताज्या बातम्याविदेश

ट्रम्प जी-20 शिखर परिषदेला राहणार अनुपस्थित

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या जी-20 परिषदेत सहभागी ह

आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचा 7 व्या सत्राचा निकाल 100 टक्के यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान
सत्तेत असूनही शिवसेनची पिछेहाट
सगळ्या निवडणूक प्रक्रियेची थट्टा करून टाकली आहे… राज ठाकरेंचा घणाघात
Trump to skip G20 summit in South Africa, V-P Vance to attend in his stead  | World News - Business Standard

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या जी-20 परिषदेत सहभागी होणार नाहीत. ट्रम्प यांनी सांगितले कि, मी दक्षिण आफ्रिकेत माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणार नाही. त्या देशाला जी-20 मध्ये असण्याचा हक्क नाही.
मियामी येथे झालेल्या अमेरिका बिझनेस फोरम दरम्यान ट्रम्प म्हणाले, दक्षिण आफ्रिकेत जी-20 ची बैठक आहे. मी तिथे जाणार नाही. दक्षिण आफ्रिकेला आता जी-20 मध्ये असायलाच नको, कारण तिथे जे घडले ते अत्यंत वाईट आहे. मी त्यांना सांगितले आहे, की मी जाणार नाही. मी तिथे माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणार नाही. त्या देशाला जी-20 मध्ये असण्याचा हक्क नाही. दक्षिण आफ्रिकेने 1 डिसेंबर 2024 रोजी एका वर्षासाठी जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारले होते आणि 22 ते 23 नोव्हेंबरदरम्यान जोहान्सबर्ग येथे या समूहाच्या नेत्यांच्या परिषदेला यजमानत्व देणार आहे. हा पहिलाच प्रसंग असेल की जी-20 शिखर परिषद आफ्रिकन खंडावर होणार आहे.

COMMENTS