जागतिक कृषी दिनाच्या निमित्ताने हिवरे बाजारमध्ये अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

Homeअहमदनगरकृषी

जागतिक कृषी दिनाच्या निमित्ताने हिवरे बाजारमध्ये अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

नगर / प्रतिनिधी-जागतिक कृषी दिनाचे औचित्य साधून १ जुलै २०२५ रोजी आदर्श गाव हिवरे बाजार येथे ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या संकल्पनेतून १८००

फक्त पावसावर विसंबून असलेल्या शेतीचे शेतकऱ्यांने केले नंदनवन. वर्षाकाठी काढले ५० लाखाचे उत्पन्न.
कोपरगाव तालुक्यातील पदवीधर मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
तब्बल 22 वर्षांपासून फरार गुन्हेगार अखेर जेरबंद

नगर / प्रतिनिधी-
जागतिक कृषी दिनाचे औचित्य साधून १ जुलै २०२५ रोजी आदर्श गाव हिवरे बाजार येथे ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या संकल्पनेतून १८०० देशी वृक्षांची लागवड सुरू झाली आहे.

मातृस्मृती वनमंदिर परिसरात पार पडलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड आणि विभागीय वन अधिकारी संजय कंद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

  कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ग्रामस्थांनी त्यांचा फेटा, शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.

 यावेळी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हर्षल काकडे, जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता श्री. शेळके, तसेच उद्योजक श्रेयस दरे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमास सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, व्हा. चेअरमन रामभाऊ चत्तर, सखाराम पादीर सर, रोहिदास पादीर, अशोक गोहड, संजय पवार आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

COMMENTS