Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक कुंभमेळयाच्या कामांमध्ये टेंडर घोटाळा; कथित ऑडिओ किल्पच्या आधारे काँगे्रस नेते वडेट्टीवार यांची टीका

मुंबई : नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड याला अटक केल्यानंतर त्याची कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील प्रशासकी

बेकायदा बांधकामे आता होणार वैध; चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा
दमानियांना माहिती पुरवणारे सरकारमध्येच! : खा. संजय राऊत
भोंदू अशोक खरातला मदत करणारे रडारवर; एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची माहिती

मुंबई : नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड याला अटक केल्यानंतर त्याची कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टीका केली आहे. कुंभमेळ्यासारख्या पवित्र उत्सवाला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले जात आहे, असा आरोप त्यांनी करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड याला अलीकडेच लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्याची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये कुंभमेळ्यासाठीच्या विविध टेंडर प्रक्रियेबाबत ‘मॅनेजमेंट’ झाल्याचे आणि कोट्यवधी रुपयांच्या कमिशनची देवाणघेवाण होत असल्याचे दावे करण्यात आल्याचे समोर येत आहे. (या क्लिपची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.) क्लिपमध्ये सुमारे 1021 कामे ठराविक व्यक्तींना देण्यात येणार असल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये तंबू उभारणी, ई-टॉयलेट, स्वच्छता यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. संबंधित अधिकार्‍यांनी या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात कमिशन मिळणार असल्याचा दावा केल्याने कुंभमेळ्याच्या पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. कथित संभाषणात कोट्यवधी रुपयांच्या कमिशनचे आमिष दाखवून टेंडर मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले जात असल्याचे समोर आले आहे. 700 तंबूंचे काम, ई-टॉयलेट्स, तसेच अन्नपुरवठ्याचे कंत्राट स्वतःकडे असल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आल्याचे सांगितले जाते. कमी खर्चात जास्त कमिशन मिळवण्याचा ‘फॉर्म्युला’ही चर्चेत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या क्लिपमध्ये कनिष्ठ अधिकार्‍यांपासून ते उच्चस्तरीय पदाधिकार्‍यांपर्यंत सर्वांची ‘टक्केवारी’ ठरलेली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोपांमुळे प्रशासकीय यंत्रणेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे. यामध्ये कोणते मंत्री, अधिकारी सहभागी आहेत, हे समोर आले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

कुंभमेळ्याची 1021 कामे मॅनेज केल्याचा दावा
मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड याला 6 लाख 37 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी ही लाच मागितल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान त्याच्या निवासस्थानातून अतिरिक्त रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. कक्ष अधिकारी विलास लाड याची एक खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर आली असून, यामध्ये त्याने नाशिक कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेबाबत धक्कादायक दावे केले आहेत. या कथित क्लिपमध्ये कुंभमेळ्यासाठीची सुमारे 1021 प्रकारची कामे ’मॅनेज’ करून ठराविक लोकांना दिली जाणार असून, त्यातून कोट्यवधींचे कमिशन मिळणार असल्याचे लाड बोलताना दिसत आहे.

COMMENTS