Homeताज्या बातम्या

भगवान विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

बीड : विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच कायद्याचे ज्ञान, हक्क व कर्तव्यांची जाणीव व्हावी तसेच उच्च शिक्षण घेऊन जबाबदार नागरिक आणि अधिकारी म्हणून

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार : मुख्यमंत्री फडणवीस
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा आ. जयंत पाटील यांना पाठिंबा
तिगावच्या सरपंच सौ. अर्चना राज पाटील यांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड २०२६’


बीड : विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच कायद्याचे ज्ञान, हक्क व कर्तव्यांची जाणीव व्हावी तसेच उच्च शिक्षण घेऊन जबाबदार नागरिक आणि अधिकारी म्हणून घडावे, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांच्या वतीने भगवान विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डॉ. वहाब सय्यद हे होते. कार्यक्रमास भगवान विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष गो. गो. मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना न्यायाधीश डॉ. वहाब सय्यद यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच कायद्याचे मूलभूत ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांचीही जाणीव असणे गरजेचे असून, उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. संस्थापक अध्यक्ष गो. गो. मिसाळ यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. हक्क, कर्तव्य आणि सामाजिक जबाबदारी यांची योग्य माहिती मिळाल्यास विद्यार्थी सक्षम नागरिक म्हणून घडतील. अशा प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले.  या शिबिरास शाळेचे मुख्याध्यापक आघाव सर, महिला व बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोकभाऊ तांगडे, समाजसेवक तत्त्वशील कांबळे, पत्रकार ज्ञानोबा वायबसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य वरिष्ठ लिपिक शिंदे सर, गायकवाड मॅडम, जोगदंड सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कायद्याचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत हक्क, कर्तव्ये तसेच न्यायव्यवस्थेबाबत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

COMMENTS