अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 'शिशु संगोपन' संस्थेच्या

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ‘शिशु संगोपन’ संस्थेच्या शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील ३८ विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी पात्र झाले असून शाळेचा निकाल ७९ टक्के लागला आहे. तसेच, श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलचे १७ विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले असून विद्यालयाचा एकूण निकाल ८५ टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना संस्थेचे चेअरमन दिलीप गुंदेचा म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रगतीचे द्योतक नाही, तर संस्थेच्या गुणवत्तापूर्ण कार्यपद्धतीचे प्रतीक आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित परिश्रमांचा हा परिणाम आहे.”
संस्थेचे व्हाईस चेअरमन दशरथ खोसे म्हणाले की, अशा स्पर्धात्मक परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला आणि आकलनशक्तीला चालना मिळते. शिशु संगोपन संस्थेने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी केले, तर आभार माध्यमिकचे मुख्याध्यापक दत्तात्रय कसबे यांनी मानले.

COMMENTS