Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजी भिडेप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा फोन

मुंबई/प्रतिनिधी ः मनोहर उर्फ संभाजी भिडे याने महात्मा गांधीप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत असून, याप्रक

करंजी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची आणि अन्नाची सोय
अहमदनगरमध्ये केमिकल कंपनीत अग्नितांडव l
 काँग्रेस पक्षाच्या वतीने  एस बी आय शाखेसमोर डफळी बजाव आंदोलन

मुंबई/प्रतिनिधी ः मनोहर उर्फ संभाजी भिडे याने महात्मा गांधीप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत असून, याप्रकरणी भिडेला अटक करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात केली होती. या रागातून पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचे फोन करण्यात आले.फोन करणार्‍या तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय चोराडे (नांदेड) असे या धमकीचे फोन करणार्‍याचे नाव आहे.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. काँग्रेसकडून अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच 24 तासात संभाजी भिडेंना अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हा काँग्रेसने दिला. या अल्टीमेटमला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. तर अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. भिडेच्या या वक्तव्याचे विधिमंडळातही पडसाद पाहायला मिळाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा मुद्दा हा विधिमंडळात मांडलाराज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना कराडमधील राहत्या घरी धमकीचे फोन आले. या धमकीच्या फोननंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराबाहेरील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात भिडेंच्या वक्तव्याचा मुद्दा मांडत अटकेची मागणी केली होती. अमरावतीत संभाजी भिडे याने महात्मा गांधींबद्दल निंदाजनक वक्तव्य केले आहे. समाजामध्ये अशाप्रकारे तेढ निर्माण करणार्‍या व्यक्तीला अटक केली पाहिजे. ही व्यक्ती अनेक वर्षांपासून हा प्रकार करतेय. ही व्यक्ती राष्ट्रपित्याबाबत असे वक्तव्य करू शकते. त्यामुळे बाहेर कसा फिरू शकतो? त्याच्या वक्तव्याचे पडसाद उमटल्यास जबाबदार कोण असेल?, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संभाजी भिडे यांना अटक करण्याची विनंती केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या मागणीमुळे त्यांना अक्षय चोराडे याने माजी मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन आणि मेल केले. मात्र काही वेळेनंतर पोलिसांनी या अक्षय चोराडेला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. आता कराड पोलिस पथक नांदेडला जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS