कुत्रा हुकला, पण बालकाचा जीव गेला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुत्रा हुकला, पण बालकाचा जीव गेला

अहमदनगर/प्रतिनिधी - कुत्र्याला मारलेला लोखंडी रॉड चिमुरड्याच्या डोक्यात घुसला व त्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना पाथर्डीत घडली. यात एका

गाव दत्तक घेऊन आदर्शगावची निर्मिती करावी
तब्बल 110 वर्षांनी झाली संस्थेची घटना अंतिम
संजीवनीचे बुद्धीबळपटू जिल्ह्यात प्रथम

अहमदनगर/प्रतिनिधी – कुत्र्याला मारलेला लोखंडी रॉड चिमुरड्याच्या डोक्यात घुसला व त्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना पाथर्डीत घडली. यात एका सात वर्षीय चिमुरड्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याने पाथर्डीत हळहळ व्यक्त होत आहेे. हुसेन रशिद शेख (वय 7) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना पाथर्डीच्या भाजी बाजारतळावर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रशिद शफी शेख हे भाजी बाजारतळ परिसरात सुरेश छबु साळुंखे यांच्या शेजारी राहतात. साळुंखे यांच्याकडेे पाळीव कुत्रे आहेत. त्यातील एक कुत्री व्यायली होती. ती कुत्री तोंडात पिल्लू घेऊन जात असताना सुरेश साळुंखेे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड कुत्रीला फेकून मारला. काँक्रीट रस्त्यावर हा रॉड आदळून रशीद शेख यांचा सात वर्षाचा मुलगा हुसेन याच्या डोक्यात घुसला. त्यामुळे हुसेन गंभीर जखमी झाला. त्याला पाथर्डी् येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नगर येथील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, हुसेनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मृत मुलाचे वडील रशीद शेख यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादींवरून पोलिसांनी सुरेश साळुंखे याच्याविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे

COMMENTS