Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दमानियांना माहिती पुरवणारे सरकारमध्येच! : खा. संजय राऊत

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या गोपनीय माहिती फुटल्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून, सत्ताधार्‍यांवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थि

भोंदू अशोक खरातला मदत करणारे रडारवर; एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची माहिती
महिला पोलिस अधिकारीही खरातच्या संपर्कात; पसंतीच्या बदलीसाठी भोंदूशी संगनमत केल्याचा संशय
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त येथे जलपूजन

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या गोपनीय माहिती फुटल्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून, सत्ताधार्‍यांवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना संवेदनशील माहिती कशी मिळते, यावरून संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राऊत यांनी स्पष्टपणे म्हटले की, दमानिया या कोणत्याही अधिकृत गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख नाहीत, तसेच त्यांच्या हातात अशी माहिती मिळवण्याची स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पोहोचणारी संवेदनशील माहिती ही सरकारमधूनच बाहेर पडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात सत्ताधारी पक्षातीलच काही जण माहिती पुरवत असल्याचा सूचक आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, जेव्हा अशा प्रकारची माहिती बाहेर येते, तेव्हा बाह्य शक्तींपेक्षा ‘स्वकीय’च अधिक लक्ष्यावर असतात. गोपनीय माहिती लीक होणे ही गंभीर बाब असून, यामुळे सरकारमधील अंतर्गत मतभेद आणि अविश्‍वास उघड होत असल्याचे त्यांनी नमूद केले. काही ठिकाणी होणार्‍या बैठका किंवा सामाजिक कार्यक्रमांवरून राजकीय अर्थ काढण्याचे प्रकारही वाढल्याची टीका त्यांनी केली. प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी विविध नेत्यांची ये-जा असते, मात्र त्याचा कोणत्याही गुप्त कारवाईशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाने नाना काटे यांना उमेदवारी दिली होती. विविध पक्षांनी अशा निवडणुकांमध्ये राजकीय गणित मांडलेले असते, त्यामुळे भावनांचा मुद्दा केवळ एका पक्षापुरता मर्यादित नाही, असे त्यांनी अधोरेखित केले. बारामतीतील राजकीय समीकरणांवर बोलताना राऊत यांनी सूचक विधान केले की, सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे, मात्र इतर पक्षांशी संवाद झाला की नाही, याबाबत स्पष्टता नाही. बारामतीत पवार कुटुंबाचे वर्चस्व असल्याने त्यांना इतर पक्षांच्या पाठिंब्याची फारशी गरज भासत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS