Homeताज्या बातम्या

विटामध्ये झोपेत असलेल्या परप्रांतीय मजुराचा डोक्यात लाकडी दांडके मारून खून; कामाच्या वादातून निष्पाप तरुणाचा बळी

विटा: विटामधील मायाक्कानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून झोपलेल्या ठिकाणी डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून एका परप्रांतीय तरुणाची

अकोलेत ‘बफर स्टॉक’ तातडीने खुला करा; खत तुटवड्याबाबत ग्राहक पंचायतचे तहसीलदारांना निवेदन
राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) बीड जिल्हा सरचिटणीसपदी श्रीनिवास राऊत यांची निवड
जंतरमंतरवरील पोलिस कारवाईचा निषेध; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीडमध्ये आंदोलन
सांगली : पोटच्या पोरानं बापाच्या डोक्यात लाकडी दांडके मारून खून

विटा: विटामधील मायाक्कानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून झोपलेल्या ठिकाणी डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून एका परप्रांतीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राजमन राजाराम कुम्हार (वय २८, रा. धामोरा, चौरी खुर्द, रायठ, सिद्धार्थनगर, बॉसी, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी अशोक कुम्हार (रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

विटा येथील मायाक्कानगर परिसरात बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी दयानंद पांडुरंग साबळे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर मृत राजमन कुम्हार आणि संशयित आरोपी अशोक कुम्हार हे दोघे जण मजुरीचे काम करत होते. काम करत असताना या दोघांमध्ये कामावरून आणि किरकोळ कारणांवरून नेहमीच वाद व बाचाबाची होत असे.

बुधवारी (२९ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास नवीन इमारतीच्या बेडरूममध्ये राजमन झोपलेला होता. जुन्या वादाचा आणि रागाचा मनात धरून आरोपी अशोक तेथे गेला. राजमन गाढ झोपेत असताना अशोकने त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजमनला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर संशयित आरोपी अशोक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी घरमालक दयानंद साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विटा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून विटा पोलीस पुढील तपास करत आहेत.

COMMENTS