Homeताज्या बातम्यामनोरंजन

महिलेने केले चक्क घटस्फोटाचे फोटोशुट

आजकाल काय होईल हे सांगता येत नाही. अनेक जण आता प्री वेडिंग, बेबी शॉवर फोटोशूट फार हौसेने हल्ली करतात. पण हे सर्व मागे टाकत एका अभिनेत्रीने घटस्फो

येमेनजवळ भारतीय जहाजावर भीषण हल्ला; १३ भारतीयांसह सर्व १४ खलाशी सुरक्षित
Shirdi : शिर्डीला दर्शनासाठी जात असाल तर आधी नवी नियमावली जाणून घ्या |
अवजड वाहनाच्या धडकेने ट्रान्सफॉर्मर जळून खाक; राहुरीत तीन दिवस अंधार; गुन्हा नोंद न झाल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

आजकाल काय होईल हे सांगता येत नाही. अनेक जण आता प्री वेडिंग, बेबी शॉवर फोटोशूट फार हौसेने हल्ली करतात. पण हे सर्व मागे टाकत एका अभिनेत्रीने घटस्फोटाचे फोटोशूट केले आहे. चेन्नईत राहणाऱ्या अभिनेत्रीने पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्याचे दु:ख करत बसण्यापेक्षा या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून हटके अंदाजात या महिलेने घटस्फोटाचे फोटोशूट केले आहे. तिने केले हे फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. घटस्फोटानंतर भारतीय महिला भावनिकदृष्ट्‌या तुटतात आणि नैराश्‍यात जातात. पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिला सामान्य जीवनात परत येण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण ही जुनी विचारसरणी मोडीत काढण्यासाठी शालिनीने हा एक उपक्रम केला. शालिनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या घटस्फोटाच्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत, शालिनीने तिच्या हातात ‘DIVORCE’अक्षरे हायलाइट करत फोटो काढले आहेत. दुसऱ्या फोटोत शालिनी स्वतःचा आणि पतीचा एकत्र फोटो फाडताना दिसत आहे.

COMMENTS