Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे लोकसभेची जबाबदारी अमित ठाकरेंवर ?

पुणे/प्रतिनिधी ः देशात लोकसभा निवडणुकीला आता अगदी काही महिने शिल्लक राहिले आहे. त्या दृष्ट्रीने सर्वच राजकीय पक्षांनी आप-आपली तयारी सुरू केली आहे

सावित्रीबाई फुले विद्यापीठांवर अमित ठाकरेंनी काढला मूक मोर्चा
पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांना अमित ठाकरेंचा टोला 
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार?

पुणे/प्रतिनिधी ः देशात लोकसभा निवडणुकीला आता अगदी काही महिने शिल्लक राहिले आहे. त्या दृष्ट्रीने सर्वच राजकीय पक्षांनी आप-आपली तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीसोबत जाणार की, युतीसोबत जाणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, मसनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मनसे नेते अमित ठाकरेंवर देण्यात येणार आहे. पक्षातील सुत्रांनी ही माहिती दिली आहे.
या संदर्भात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांचे पुणे लोकसभा मतदार संघावर विशेष लक्ष आहे. त्यामुळे या मतदारसंघाची जबाबदारी राज ठाकरे हे अमित ठाकरेंवर देण्याची शक्यता आहे. त्या दृष्ट्रीने होणार्‍या मोर्चेबांधणीची जबाबदारी देखील अमित ठाकरेंवर देण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काळातील प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार देणार असल्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या आधीच जाहीर केले होते. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत मनसे मोजक्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यात पुणे लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे. येथे उमेदवार निवडीसाठी अमित ठाकरे हे पूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिल्यास पुण्यातील राजकारणात मोठे फेरबदल होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

COMMENTS