Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारेंचा हट्टीपणा, मोरेंची माघार

रत्नापूर ग्रामपंचायत निवडणुकीत ट्विस्ट

जामखेड प्रतिनिधी ः रत्नापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2022 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी पंचायत सम

उस्मानाबाद तालुक्यात आमदारांनी राखला गड,
चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान
पाथर्डी तालुक्यात १४ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

जामखेड प्रतिनिधी ः रत्नापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2022 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे यांचा सहमतीचा प्रस्ताव नाकारला. सुर्यकांत मोरेंनी शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता सुर्यकांत मोरेंच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.
वारे मोरे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. मात्र गावपातळीवर पक्ष नको. एकत्र येऊन एकच पँनल देऊ. चर्चा करून सरपंचपदाचा उमेदवार व सदस्यांच्या जागा वाटप करण्याचा निर्णय घेऊ असा प्रस्ताव सुर्यकांत मोरे यांनी दत्तात्रय वारे यांच्याकडे ठेवला.  सरपंचपदाच्या उमेदवारीबाबत एकमत झाले नाही. वार्ड नं 1 मध्ये एकमत झाले. मात्र वार्ड क्रमांक 2 व 3 मध्ये सहा जागांवर तीन तीन उमेदवार देण्यावर एकमत झाले नाही. तेव्हा मोरेंनी चार तुम्हाला घ्या दोन आम्हाला द्या असाही प्रस्ताव मांडला. वारे यांनी तोही नाकारला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात रत्नापूर ग्रामपंचायत आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी दत्तात्रय वारे व सुर्यकांत मोरे यांच्यामध्ये समेट करण्यासाठी एकत्र बैठक घेतल्याचे समजते. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दत्तात्रय वारे यांच्या मतलबी हट्टामुळे एकमत झाले नाही. त्यामुळे सुर्यकांत मोरेंनी आपल्या सर्वच समर्थकांचे अर्ज माघारी घेऊन धक्का दिला आहे. सत्ताधारी भाजपा समोर राष्ट्रवादीकडून आता दत्तात्रय वारे यांच्या गटाला एकट्यानेच लढावे लागेल. दत्तात्रय वारेंच्या चिकटपणा व हट्टीपणामुळे सूर्यकांत मोरेंचा गट निवडणुकीत सहकार्य करील की नाही याबाबत शंका आहे असे ग्रामस्थांनी सांगितले.  सुर्यकांत मोरे ग्रामपंचायत निवडणुकीत काय भुमिका घेणार याकडे लागले आहे.

COMMENTS