उस्मानाबाद तालुक्यात आमदारांनी राखला गड,

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उस्मानाबाद तालुक्यात आमदारांनी राखला गड,

अनेक ठिकाणी प्रस्तापितांना धक्का

उस्मानाबाद प्रतिनिधी - तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजनी महसुल भवन येथे पार पडली . भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वतःचे ग

वारेंचा हट्टीपणा, मोरेंची माघार
बुलढाण्यातील 259 ग्रामपंचायतीचा 80.47 टक्के मतदान
पाथर्डी तालुक्यात १४ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

उस्मानाबाद प्रतिनिधी – तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजनी महसुल भवन येथे पार पडली . भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वतःचे गाव तेर ग्रामपंचायतीचा गड राखत सरपंचसह दहा सदस्य विजयी झाले मात्र विरोधी महाविकास आघाडीनेही मुसंडी मारत अपवाद वगळता प्रत्येक वार्डात एक असे ७ सदस्य निवडून आनले . उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी स्वतःच्या सारोळा गावात सरपंच पदासह सर्व ११ सदस्य विजयी करण्यात यश संपादन केले . प्रमुख तडवळ्यात सत्ताधारी सुरेश पाटील यांना धक्का देत विरोधकांनी विजय मिळवला तसेच अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना धक्का बसला आहे . महसुल भवन येथे ३० टेबलवर ७ फेऱ्यात मतमोजणी पार पडली .विजयी उमेदवार व समर्थकांनी जल्लोष केला .

COMMENTS