Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने आपला पक्ष संपविला : आ चंद्रकांत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्यात भाजप पक्ष नंबर 1 चा पक्ष बनला आहे. शिवसेनेने मात्र मुख्यमंत्री पदासाठी आपला पक्ष संपविला आहे, हे अजूनही त्यांच्या

भाजपला चार राज्यात यश; इस्लामपूरात भाजपाचा जल्लोश
शासनाच्या योजना राबवून समाज सुखी झाला का? : भास्करराव पेरे-पाटील यांचा सवाल
राष्ट्रपती रायगड दौर्‍यानिमित्त हेलिपॅडला विरोध झाल्याने राष्ट्रपती गडावर ’रोप वे’ ने जाणार

इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्यात भाजप पक्ष नंबर 1 चा पक्ष बनला आहे. शिवसेनेने मात्र मुख्यमंत्री पदासाठी आपला पक्ष संपविला आहे, हे अजूनही त्यांच्या लक्षात येईना, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
पेठ नाका येथे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत विजयी झालेल्या भाजपच्या सदस्यांचा सत्कार आ. पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राहूल महाडीक, सी. बी. पाटील, सम्राट महाडीक, संग्राम देशमुख, सत्यजीत देशमुख उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकांत भाजपने 21 जागा जिंकल्या. त्यामुळे भाजप राज्यात 1 नंबरचा पक्ष झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला 17 जागा मिळाल्या तर शिवसेनेला केवळ 12 जागा मिळाल्या. मुख्यमंत्री पदासाठी सेनेने आपला पक्ष संपविला आहे. गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे. तरीही ही गोष्ट शिवसेनेच्या लक्षात येत नाही. असो हा त्यांचा प्रश्‍न आहे. यापुढे भाजप सर्व निवडणूका पक्षाच्या चिन्हावर लढवेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

COMMENTS