Homeताज्या बातम्या

दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच देवपूजा : आ. काळे

कोपरगाव : दिव्यांगांना मदत करणे हे माझे समाजाप्रती असलेले कर्तव्य आहे. प्रत्येक दिव्यांगाने कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने जगावे या उद्देश

झुंबरबाई घोलप यांचे निधन
चहाच्या पॅकेटवर उत्पादन दिनांकच नाहीश्रीगोंद्यात  ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
महानगरपालिकेत पेन्शन असोसिएशनचे धरणेदोन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन देण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन

कोपरगाव : दिव्यांगांना मदत करणे हे माझे समाजाप्रती असलेले कर्तव्य आहे. प्रत्येक दिव्यांगाने कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने जगावे या उद्देशातून आजवर आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातून जवळपास ८०० हून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे त्या दिव्यांग बांधवांच्या वेदना तर दूर झाल्या. दिव्यांग बांधवांना दयेची नव्हे, तर सन्मानाची गरज असून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि हास्य ही माझ्यासाठी खरी देवपूजा, ध्यान आणि जप असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबई (जयपूर) व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बंधू भगिनींसाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात गुरुवार दि.२५ रोजी दिव्यांग बंधू भगिनींची तपासणी करून दिव्यांगांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयवांचे अचूक मोजमाप घेऊन शुक्रवार (दि.२६) रोजी कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्याचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात  १९७ दिव्यांग बांधवांना वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले कि, दिव्यांग बंधू भगिनींना दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी सिव्हील हॉस्पिटल अहिल्यानगर येथे जाण्या-येण्याच्या अनेक अडचणी येत असल्याने दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी मोफत वाहन सुविधा गेल्या सात वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे. या सुविधेच्या माध्यमातून आजपर्यंत दोन हजारहून अधिक दिव्यांग बंधू भगिनींनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले असून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे. मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली. या संधीच्या माध्यमातून जनसेवा करीत आहे. दिव्यांग बांधवांच्या अडचणी व त्यांचे परावलंबी जीवन स्वावलंबी कसे करता येईल यासाठी माझा खटाटोप सुरु असून मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे आणि यापुढेही करीत राहणार असल्याची ग्वाही  आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, श्री भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे पदाधिकारी, साईबाबा संस्थान शिर्डी हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांचे सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS