Homeताज्या बातम्या

विठ्ठलनामाच्या घोषाने बेलापूर दुमदुमले ! 

बेलापूर : ज्या बेलापूर येथील भानुदास महाराज हिरवे यांनी निवृत्तीनाथाच्या पालखीची परंपरा सुरु केली त्या बेलापूर नगरीत निवृत्तीनाथाच्या पालखीचे उत्

चेन्नई येथील भक्ताकडून १३ लाखांचा शंख साई चरणी अर्पण
कर्जत येथे २४५ जेष्ठांची आरोग्य तपासणी
जवळे गावातील वृद्धांना आधार काठीचे वाटप 

बेलापूर : ज्या बेलापूर येथील भानुदास महाराज हिरवे यांनी निवृत्तीनाथाच्या पालखीची परंपरा सुरु केली त्या बेलापूर नगरीत निवृत्तीनाथाच्या पालखीचे उत्साहत स्वागत करण्यात आले. विठ्ठलनामाच्या जायघोषाने गाव दुमदूमले. गावाकऱ्यांनी वारकऱ्यांचे भक्तीभावाने स्वागत केले.टाळ मृदूंगाच्या तालावर  भजन, फुगडी अशा चैतन्यमय वातावरणात बेलापूरकर भक्तीरसात तुडुंब नहाले. गुरुवारी सकाळी परंपरेनुसार ग्रामस्थांनी दिंडीला भावपूर्ण निरोप दिला. त्रिंबकेश्वर येथून प्रस्थान होणाऱ्या दिंडीचे बेलापूरचे भानुदास महाराज हिरवे जनक मानले जातात. त्यामुळे या दिंडीचा बेलापूरातील विठ्ठल मंदिरात मुक्काम पडतो. मनाची दिंडी असल्याने बेलापूरकर या दिंडीचे उत्साहाने स्वागत तसेच वारकऱ्यांचे आदरांतिथ्य करतात. बुधवारी दिंडीचे गावात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. श्रीरामपूर ते बेलापूर दरम्यान हिंदू -मुस्लिमसह सर्वधर्मिय बांधवांनी आणि संघटनाकडून ठिकठिकाणी फराळ, चहापान, पिण्याचे पाणी आणि निवांऱ्याची व्यवस्था करण्यात आली.गावातील विविध संस्था तसेच मान्यवरानी स्वागत केल्यावर पालखी विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाली. यावेळी महिलांनी फुगडी खेळून आनंद लुटला. पालखी मार्ग रांगोळ्यांनी सजला होता. गावातून पालखी जाताना ठिकठिकाणी भाविकांनी दर्शन घेतले. संध्याकाळी गावातील विविध संस्था, सर्वधार्मिय संघटना तसेच व्यक्तींनी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.विठ्ठल मंदिरात पालखीने मुक्काम पडल्यावर दर्शनासाठी मंदिरात भाविकानी गर्दी केली. रात्रभर भजन, कीर्तन व हरीनामाचा जयघोष झाला. पहाटे पालखी पंढरीकडे मार्गस्थ झाली. गावाकऱ्यांनी परंपरेनुसार पालखीला भक्तीभावे निरोप दिला. 

COMMENTS