Homeताज्या बातम्यादेश

आचार्य प्रमोद कृष्णम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

नवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील काँगे्रसचे वजनदार ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची रविवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कार

आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी क्रितीनं नेसली गोल्डन साडी !
विषमुक्त शेतीसह विषमुक्त कृषी उत्पादने काळाची गरज : ना. देवेंद्र फडणवीस
मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ देणार नाही – जयंत पाटील | LokNews24

नवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील काँगे्रसचे वजनदार ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची रविवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेसबाबत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडण्यास सुरुवात केली होती. स्वपक्षाच्याच धोरणांवर काही प्रसंगी त्यांनी टीकाही केली होती. या पार्श्‍वभूमीवर आचार्य प्रमोद कृष्णम लवकरत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली होती. त्यात आता त्यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांच्याविरोधात सातत्याने होत असलेले बेशिस्तीचे आरोप आणि जाहीरपणे पक्षाविरोधात केली जाणारी वक्तव्य पाहाता काँग्रेस पक्षाध्यक्षांनी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सादर करण्यात आलेली शिफारस मान्य केली आहे. या शिफारशीनुसार आचार्य प्रमोद कृष्णम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

COMMENTS