Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावकरी पतसंस्थेस कार्यक्षम पतसंस्था पुरस्कार प्रदान

बेलापूर/प्रतिनिधी ः श्रीरामपूर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दिला जाणार्‍या कार्यक्षम पतसंस्था  पुरस्कार हा बेलापुरातील गांवकरी पतसंस्

तब्बल 123 कोटी रुपये खर्च करायचेत व तेही 15 दिवसात
मित्राच्या वाढदिवसाला नेत पतीने पत्नीवर करवला सामूहिक बलात्कार | LOKNews24
शेवगाव शहरात सायकल फेरी काढून मतदान जागृती अभियान

बेलापूर/प्रतिनिधी ः श्रीरामपूर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दिला जाणार्‍या कार्यक्षम पतसंस्था  पुरस्कार हा बेलापुरातील गांवकरी पतसंस्थेस मिळाला आहे. तालुक्यात चांगले कार्य करणार्‍या पतसंस्थाचा काम करण्याचा उत्साह टिकुन राहावा याकरीता श्रीरामपूर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने कार्यक्षम पतसंस्था पुरस्कार देवुन गौरविण्यात येते. या वर्षी 10 कोटी ते 25 कोटी ठेव असणार्‍या, पतसंस्थेच्या मोठ्या गटात पहिला क्रमांक गुरुदेव काटेस्वामी पतसंस्थेस देण्यात आला असून द्वितीय क्रमांक लोकमाता अहिल्याबाई होळकर व सुदर्शन पतसंस्थेस विभागुन देण्यात आला आहे.
तर तृतीय क्रमांक महेश नागरी पतसंस्थेस देण्यात आलेला आहे. ठेव 1 कोटी ते 10 कोटी लहान गटात पहिला क्रमांक अनामत नागरी पतसंस्थेने मिळविला तर द्वितीय क्रमांक बेलापूरातील महालक्ष्मी महिला पतसंस्थेने तर तिसरा क्रमांक गावकरी पतसंस्थेने मिळविला. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात या सर्वांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. या वेळी मोठ्या गटात उत्कृष्ट चेअरमन म्हणून अनिरुद्ध महाले, यांना तर लहान गटात याकुबभाई बागवान यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी तालुका फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे मंजुश्री मुरकुटे सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्ष शशिताई अहीरे शशीकांत कडुस्कर अकोले येथील भाऊसाहेब नवले अशोक राशिनकर देविदास चव्हाण, महेश ओहोळ गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे, व्हा चेअरमन रामेश्‍वर सोमाणी, उपसरपंंच अभिषेक खंडागळे संचालक पुरुषोत्तम भराटे, जालींदर कुर्हे रावसाहेब अमोलीक, मोहसीन सय्यद, भाऊसाहेब तेलोरे, प्रविण बाठीया, अजीज शेख, महेश कुर्हे, तसवर बागवान, मॅनेजर संदीप लोखंडे उपस्थित होते.

COMMENTS