पाच रुपयांच्या नव्या लिंकने घातलाय धुमाकूळ

Homeताज्या बातम्या

पाच रुपयांच्या नव्या लिंकने घातलाय धुमाकूळ

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सोशल मिडीयावर जनजागृतीसाठी एक पोस्ट शेअर केली असून सोशल मिडीया

भिंगार पोलिसांकडून दहा गोवंशीय जनावरांची सुटका
रोटरी क्लब शेवगाव आयोजित सूर नवा ध्यास नवा दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न
शहर सहकारी बँकेचे बोगस कर्ज प्रकरण आता चर्चेत ; पुरवठादार मालपाणीला झाली अटक

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सोशल मिडीयावर जनजागृतीसाठी एक पोस्ट शेअर केली असून सोशल मिडीयावर येणार्‍या पाच रुपयांच्या नव्या लिंकने सध्या धुमाकूळ घातल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. तुमच्या नावाने महागडे कुरिअर आले असून ते मिळविण्यासाठी आम्ही पाठविलेल्या लिंकवर क्लिक करून पाच रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करा, त्यानंतर हे कुरिअर तुमच्यापर्यंत पोहोचेल, असा मेसेज अनेकांना येत आहे. त्यानंतर या लिंकवर क्लिक करुन 5 रुपये पाठविल्यास काही वेळातच संबंधित नागरिकांच्या बँक खात्यातील सर्व पैसे गायब होत आहेत. त्यामुळे अशा लिंक ओपन करू नयेत किंवा डाऊनलोड करू नयेत, असे आवाहन नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे. दरम्यान, अशी फसवणूक झालेल्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS