Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज ः विवेक कोल्हे

कोपरगाव - मैदानी खेळ खेळल्याने शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्त राहते. बहुतांशी मैदानी खेळ हे सांघिक प्रकारचे असल्याने त्यातून सांघिक भाव

जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी विवेक कोल्हे
नवरात्रोत्सवातच नव्हे तर वर्षभर स्त्रीशक्तीचा आदर करा ः विवेक कोल्हे
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट सर्वांनी पाहावा ः विवेक कोल्हे

कोपरगाव – मैदानी खेळ खेळल्याने शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्त राहते. बहुतांशी मैदानी खेळ हे सांघिक प्रकारचे असल्याने त्यातून सांघिक भावना आणि आत्मविश्‍वास वाढीस लागतो तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यदेखील बळकट होते. त्यामुळे मैदानी खेळांना आणि हा खेळ खेळणार्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावाच्या दौर्‍यावर असताना विवेक कोल्हे यांनी तेथील शिवसूत्र युवा प्रतिष्ठानच्या व्हॉलीबॉल ग्राऊंडवर युवकांच्या आग्रहास्तव भेट देत खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच प्रोत्साहन दिले. शिवसूत्र युवा प्रतिष्ठानने आपल्या सामाजिक कार्यातून तालुक्यामध्ये वेगळा ठसा उमटविला असून, प्रतिष्ठानने मैदानी खेळातून युवकांचे उभारलेले संघटन हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. शिवसूत्र युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील मारुती मंदिर येथे नियमितपणे सायंकाळी व्हॉलीबॉल खेळ खेळला जातो, अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी यावेळी दिली. याप्रसंगी आरपीआय (आठवले गट) चे प्रदेश सचिव दीपकराव गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव वक्ते, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, भाजप युवा मोर्चा कोपरगाव तालुका उपाध्यक्ष सुधाकर वक्ते, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, कोंडीराम वक्ते, रामभाऊ वक्ते, हनुमंतराव मेहेत्रे, बारकु मेहेत्रे, भास्कर गायकवाड, भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष सुमित पगारे, किशोर गायकवाड, संदीप राऊत, राहुल वक्ते, शशिकांत वक्ते, ऋषिकेश वक्ते, गौतम गायकवाड, अभिजीत गुरसळ, सागर गुरसळ, रघुनाथ गुरसळ, किरण गुरसळ, बंटी मेहेत्रे, कैलास जोर्वे, शरद चव्हाण, सुधाकर चव्हाण, साईनाथ वायकर, राहुल देवकर, लाला गांगुर्डे, सुनील वक्ते, राजेंद्र वक्ते, अक्षय चव्हाण, संजय गुरसळ, लहानु गायकवाड, बलवीर गरूड, गौरव पवार, गौरव गुरसळ, सौरव वक्ते, अजय गुरसळ, प्रसाद सोळके, सुरज चव्हाण, सौरव पवार, कार्तिक मेहेत्रे, नीलेश शिंदे, रवी पवार, अजय गोरसे, पिनु पवार, अवी पगारे, पप्पू गायकवाड, सागर गायकवाड आदींसह युवा खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS