Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रांजणगाव रोड येथे कुस्ती आखाड्याच्या कामास प्रारंभ; पैलवानांसाठी आधुनिक सुविधेची निर्मिती

सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगाव रोड परिसरातील गोसावी बाबा मंदिराजवळ नवीन कुस्ती आखाड्याच्या कामाचा प्रारंभ सोमवारी (दि. २५ मे) करण्यात आला. पर

कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात खा. लंके आक्रमक २३ जूनला सर्वपक्षीय, शेतकरी संघटनेचे आंदोलन ;  मुख्यमंत्र्यांना निवेदन
रांजणगाव-पिंपरी गवळी येथे शिवरस्त्याच्या कामास प्रारंभ
पारनेरमध्ये पाण्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू  
बदलांच्या 'आखाड्या'त

सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगाव रोड परिसरातील गोसावी बाबा मंदिराजवळ नवीन कुस्ती आखाड्याच्या कामाचा प्रारंभ सोमवारी (दि. २५ मे) करण्यात आला. परिसरातील ग्रामस्थ व विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

पारनेरचे ख्यातनाम पैलवान प्रकाश गाढवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुस्ती आखाड्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या आखाड्याच्या निर्मितीमुळे परिसरातील कुस्तीपटूंना व नवोदित युवकांना नियमित सरावासाठी दर्जेदार आणि हक्काची सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील लाल मातीची कुस्ती परंपरा टिकवून ठेवण्यासाठी हा आखाडा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या प्रसंगी माजी सरपंच आप्पासाहेब शिंदे पाटील, सरपंच महेश देशमुख, उपसरपंच शिवाजी शिंदे, आप्पासाहेब देशमुख, अंकुशराव जवक, ज्ञानदेव लोणकर, सुरेश गाढवे, आप्पा गाढवे, काशिनाथ लोणकर, विलास गाढवे, आबासाहेब शिंदे, रमेश शिंदे, मनोहर कदम, चांगदेव जवक, विलासराव देशमुख, विक्रम गारकर, हरी शिंदे, चंद्रकांत शिंदे, अनिल गाढवे आदींसह परिसरातील ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS