Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यात महात्मा दिन उत्साहात साजरा

कोपरगाव प्रतिनिधी ः महान समाजसुधारक ज्योतीराव फुले यांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर विठ्ठल कृष्णाजी वंडेकर यांच्या हस्ते मुंबईती

शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू ः आ. रोहित पवार
शारदा शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
आई ज्याला कळली तो खरा भाग्यवान ः डॉ. बाबुराव उपाध्ये

कोपरगाव प्रतिनिधी ः महान समाजसुधारक ज्योतीराव फुले यांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर विठ्ठल कृष्णाजी वंडेकर यांच्या हस्ते मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे तमाम जनतेच्या वतीने 11 मे 1888 रोजी ’महात्मा’ या पदवीने गौरविण्यात आले. तेव्हापासून जोतीराव फुले हे महात्मा फुले नावाने परिचित झाले. म्हणून 11 मे हा दिवस ’महात्मा दिन’ कोपरगाव येथील धोत्रे गावात श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे उत्तर जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे  होते यावेळी अशोक माळवदे, मुकुंद काळे, संघांचे कार्यअध्यक्ष डॉ. मनोज भुजबळ यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले. या वेळी संतोष रांधव, संदीप डोखे, अनंत वाकचौरे, अमोल माळवदे, शेखर बोरावके, मनोज चोपडे, ओकांर वढणे, सामाजिक कार्यकर्ते सतिशराव शेटे, सुर्यभान घाटे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीपजी चव्हाण, पोलिस पाटील देवेश माळवदे, संदीप भाटे, हेलोडे मामा, नितीन रोकडे, भारत चव्हाण, नारायण पोटे, सुमनबाई शिंदे ग्रामपंचायत शिपाई, सागर शिंदे, राजेंद्र माळवदे, व धोत्रे ग्रामस्थ उपस्थित होते. योगेश ससाणे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले

COMMENTS