Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पाच राज्यांच्या विधानसभा निकालाकडे देशाचे लक्ष; प्रादेशिक अस्मितेची कसोटी; पश्‍चिम बंगालमध्ये कमळ फुलणार का?

नवी दिल्ली : देशाच्या राजकीय दिशेला आकार देणारे मानले जाणारे पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पाँडिचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडण

सत्तेमागची सत्ता !
पश्चिम बंगालसह आसाम, पाँडिचेरी मध्ये मिळालेल्या विजयाने भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा जल्लोष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आसाममधील चहाच्या माळ्याला भेट;काम करणार्‍या महिलांशी सदाला संवाद; मोदींनी केले मळ्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर
कौल पाच राज्यांचा... - Marathi News | Mumbai Tarun Bharat

नवी दिल्ली : देशाच्या राजकीय दिशेला आकार देणारे मानले जाणारे पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पाँडिचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज सोमवारी 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. एप्रिल महिन्यात पार पडलेल्या मतदानानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत बहुतांश राज्यांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक अस्मिता, विकासाचे मुद्दे आणि सत्तांतराची शक्यता या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या निवडणुकांचे निकाल आगामी राष्ट्रीय राजकारणासाठीही महत्त्वाचे ठरणार आहेत. या निवडणुकांत ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन आणि हिमंता बिस्वा सरमा यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या राजकीय भवितव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्ष पुन्हा एकदा सत्ता राखण्याच्या प्रयत्नात आहे. राज्यात दोन टप्प्यांत मतदान झाले असून यंदा मतदानाची टक्केवारी अत्यंत उच्च राहिली आहे.294 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी 148 जागांची गरज आहे. मागील निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते, तर विरोधकांनीही जोरदार आव्हान उभे केले होते. यंदा ही लढत अधिक चुरशीची मानली जात आहे. तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडले. येथे पारंपरिक द्रविडी राजकारणाचा प्रभाव कायम असून सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी गटांमध्ये थेट सामना पाहायला मिळाला. 234 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गट पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीसमोर विरोधी आघाडीने जोरदार आव्हान उभे केले आहे. 140 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी 71 जागांची गरज आहे. मागील निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला स्पष्ट यश मिळाले होते. आसाममध्येही मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. नागरिकत्वाशी संबंधित मुद्दे आणि प्रादेशिक प्रश्‍न यांमुळे येथील निवडणूक विशेष चर्चेत राहिली. 126 जागांच्या विधानसभेत 64 जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत. हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाला विरोधकांकडून कडवे आव्हान मिळाले आहे. पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशात 30 जागांसाठी मतदान झाले. येथे सत्ताधारी गट आणि विरोधी आघाडी यांच्यात थेट लढत झाली आहे. बहुमतासाठी 16 जागांची आवश्यकता असून एन. रंगास्वामी पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

राष्ट्रीय राजकारणावर परिणामाची शक्यता
या पाच राज्यांच्या निकालांचा प्रभाव केवळ संबंधित राज्यांपुरता मर्यादित राहणार नाही. केंद्रातील सत्तासमीकरणे, आगामी निवडणुका आणि राजकीय आघाड्यांचे भविष्य यावरही या निकालांचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजचा दिवस प्रादेशिक राजकारणातील शक्तिसंतुलन ठरवणारा ठरणार असून, कोणत्या नेत्याच्या गालावर विजयाचा गुलाल लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS