Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ताजनापूर लिफ्टचे काम प्रगतीपथावर

दोनही कुंडात पाणी यशस्वीरित्या पोहोचले ः आमदार राजळे

शेवगाव तालुका ः अखेर ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा 2 चे पाणी वितरण कुंडात पोहोचले, शेवगाव तालुक्यातील वीस गावांसाठी संजीवनी ठरणारी ताजनापूर उपस

वकील संघटनेने करोना संकटात केलेले मदत व जागृतीचे कार्य अभिनंदनास्पद : जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर
आंब्यांची आवक वाढली व भावही घसरले
नगरमध्ये दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या

शेवगाव तालुका ः अखेर ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा 2 चे पाणी वितरण कुंडात पोहोचले, शेवगाव तालुक्यातील वीस गावांसाठी संजीवनी ठरणारी ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा दोन ही योजना अंतिम टप्प्यात असून योजनेच्या पाच पैकी दोन वितरण कुंडात पाणी पोहोचून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे, उर्वरित वितरण कुंडांतून पाण्याची चाचणी घेण्यासाठी ताजनापूर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उप कार्यकारी अभियंता श्रीहरी कुलकर्णी व त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
2014 सालापासून या भागाचे प्रतिनिधित्व करत असताना तानापुर उपसा सिंचन योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध केला, आतापर्यंत या योजनेसाठी सुमारे 120 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. योजनेच्या मुख्य पंपग्रह पोच कालवा उर्दूगामी नलिका, वितरण कुंड यांची कामे पूर्ण झाली आहेत. योजनेच्या वितरण कुंडा पुढील पाईप वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर असून जून 2े24 अखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले. जायकवाडी जलाशयातून ताजनापूर उपसा सिंचन योजनेसाठी 3878 द.ल.घ. फु. पाणी आरक्षित करण्यात आले पैकी  1611द.ल.घ. फु. पाणी टप्पा एक साठी तर उर्वरित 2267 द.ल.घ. फु. पाणी  टप्पा दोन साठी उपलब्ध आहे, यामध्ये वीस गावातील 6960 हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचा लाभ होणार आहे. योजनेच्या एम आर 2 एम आर 3च्या पंपाची यशस्वी चाचणी झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, लवकरच या योजनेचा लाभ शेतकर्‍यांना मिळणार असल्याची माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.

COMMENTS