Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणूक विभागामार्फत ’अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन

15 सप्टेंबरपर्यंत नामांकन सादर करण्याचे आवाहन

अहमदनगर/प्रतिनिधी ः आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जागृती व्हावी यादृष्टीने निवडणूक विभागामार्फत अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेच

देशभक्तीची ज्योत कायम तेवत ठेवा : महेश बनकर
आ. रोहित पवार, माजी मंत्री प्रा. शिंदेंचे खेळ ठरले राजकीय चर्चेचे विषय
भारत संकल्प यात्रेचे धोत्रे गावात जोरदार स्वागत

अहमदनगर/प्रतिनिधी ः आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जागृती व्हावी यादृष्टीने निवडणूक विभागामार्फत अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जनसंज्ञापन, वृत्तपत्रविद्या तसेच सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर, 2023 पर्यंत नामांकन सादर करण्याचे आवाहन निवडणूक विभागामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
      या स्पर्धेत ध्वनी चित्रफीत स्वरुपात जाहिरात निर्मिती, पोष्टर आणि घोषवाक्य लेखन या तीन प्रकारात स्पर्धा होणार आहे. या तीनही स्पर्धाचे विषय आणि नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जाहिरात निर्मितीसाठी पहिले पारितोषिक एक लाख रुपये, दुसरे पारितोषिक 75 हजार रुपये, तिसरे पारितोषिक 50 हजार रुपये तर  दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी दहा हजार रुपयांची असणार आहेत. भित्तीपत्रक स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 50 हजार रुपये, दुसरे पारितोषिक 25 हजार रुपये, तिसरे पारितोषिक दहा हजार रुपये असणार आहे. दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी पाच हजार रुपयांची असणार आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25 हजार रुपये, दुसरे पारितोषिक 15 हजार रुपये, तिसरे पारितोषिक 10 हजार आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी पाच हजार रुपयांची असणार आहेत. जिल्ह्यातील पत्रकारीता मास मीडिया संबंधीत तसेच कला शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

COMMENTS