Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडक तपासणीचा खेळ; अंदाज समितीच्या दौर्‍याने उघडले प्रश्‍नचिन्हांचे जाळे

नांदेड : महाराष्ट्र विधानसभेच्या अंदाज समितीचा नांदेड दौरा मोठ्या गाजावाजात पार पडला; मात्र या दौर्‍याचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला, यावर आता जिल्

विष्णुपूरी उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय समितीकडून प्रत्यक्ष पाहणीनिकृष्ट कामावरून अधिकार्‍यांना फटकारले, नमुने जप्त!
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगितीमुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल
चौकशीचा फार्स की कारवाईची तयारी?मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामसेवकांवर ’मुंढे पॅटर्न’ लागू होणार का?सीईओ विशाल पाटील यांच्याकडून कठोर निर्णयाची ग्रामस्थांना अपेक्षा
नांदेड जिल्ह्यात 8 ते 10 एप्रिल या कालावधीत विधानमंडळाच्या अंदाज समितीचा  दौरा आयोजित करण्यात आला होता. अंदाज समितीचा सदस्य या नात्याने या ...

नांदेड : महाराष्ट्र विधानसभेच्या अंदाज समितीचा नांदेड दौरा मोठ्या गाजावाजात पार पडला; मात्र या दौर्‍याचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला, यावर आता जिल्ह्यात तीव्र चर्चा रंगू लागली आहे. प्रशासनाच्या धावपळीला आणि तयारीला तोड नव्हती, पण समितीच्या तपासणीत अपेक्षित धार दिसली नाही, अशी टीका नागरिकांतून पुढे येत आहे.
समितीने काही ठराविक कार्यालयांवरच लक्ष केंद्रित केल्याचा आरोप होत असून, त्यामुळे अनेक महत्त्वाचे विभाग तपासणीच्या कक्षेबाहेर राहिल्याची भावना व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण यांसारख्या कोट्यवधींच्या निधीशी संबंधित विभागांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी सातत्याने होत असताना, त्या मुद्द्यांवर ठोस झाडाझडती झाली नाही, असे चित्र दिसून आले.
तीन दिवसांच्या मर्यादित दौर्‍यात सर्व विभागांचा सखोल आढावा घेणे शक्य नसले, तरी समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहून व्यापक तपासणी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात केवळ सात सदस्य उपस्थित होते. त्यातही स्थानिक दोन आमदारांकडून अधिक सक्रिय भूमिका अपेक्षित असताना, बहुचर्चित कार्यालयांना भेटी देण्यात आलेल्या कमतरतेची चर्चा आता सुरू आहे. ज्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होतो, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कामांची पाहणी करणे ही समितीची प्राथमिक जबाबदारी होती. मात्र, निवडक ठिकाणांपुरतीच तपासणी मर्यादित राहिल्याने अनेक विभागांचे प्रमुख या तपासणीतून सहज सुटल्याचे चित्र आहे. परिणामी, निधीचा योग्य विनियोग झाला का, या मूलभूत प्रश्‍नाचे उत्तर अद्याप अनुत्तरितच राहिले आहे. समितीच्या दौर्‍यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्‍वास सोडल्याची चर्चा असून, कागदोपत्री कामे आणि निवडक स्थळांच्या पाहणीवरच दौरा आटोपल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या दौर्‍याचा मूळ उद्देश-शासकीय निधीच्या वापराची पारदर्शक पडताळणी-अधांतरी राहिल्याची भावना नागरिकांमध्ये अधिक तीव्र होत आहे.

COMMENTS