Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज नगरपंचायतीचे रणशिंग फुंकले! युवा नेते रणजित आडसकर यांच्या एन्ट्रीने राजकीय समीकरणे बदलणार?

केज : येणार्‍या वर्षात होऊ घातलेल्या केज नगरपंचायत निवडणुकीचे वेध आतापासूनच शहरवासीयांना लागले आहेत. या निवडणुकीतील सर्वात मोठी आणि चर्चेची घडामो

आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश; सिरसाळा येथील घरकुल धारकांचे थकीत हप्ते खात्यावर जमा!
ट्रान्सजेंडर विधेयकाविरोधात बीडमध्ये विविध संघटनांचा निषेध; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
अंमळनेर पोलीसांची धडाकेबाज कारवाई; कोयता गँगवर ताबा

केज : येणार्‍या वर्षात होऊ घातलेल्या केज नगरपंचायत निवडणुकीचे वेध आतापासूनच शहरवासीयांना लागले आहेत. या निवडणुकीतील सर्वात मोठी आणि चर्चेची घडामोड म्हणजे युवा नेते रणजित आडसकर यांचा होत असलेला दमदार प्रवेश. स्व. बाबुरावजी आडसकर यांचा राजकीय वारसा आणि ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांचे मार्गदर्शन लाभलेल्या रणजित आडसकर यांच्या सक्रियतेमुळे केजच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
रणजित आडसकर यांनी केजच्या राजकारणात उडी घेण्याचे संकेत दिल्याने प्रस्थापित गटांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अभ्यासू आणि संयमी नेतृत्व अशी ओळख असलेल्या आडसकरांकडे नव्या पिढीचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नावर खिळले आहे-ते थेट नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरणार की नगरसेवक म्हणून निवडणूक लढवून ‘किंगमेकर’ची भूमिका निभावणार? कोणताही पर्याय निवडला तरी त्यांच्या प्रवेशाने निवडणुकीत चुरस वाढणार हे निश्चित. यंदाची निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित राहणार नसून ती अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. प्रमुख गट असे: आडसकर गट (रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली) आ. मुंदडा गट खा. बजरंग बप्पा सोनवणे गट खा. रजनीताई पाटील गट हारुणभाई इनामदार गट पशुपतीनाथ दांगट पाटील गट अंकुश अण्णा इंगळे गट याशिवाय अपक्ष उमेदवार आणि स्थानिक आघाड्याही जोरदार तयारीत असून, ते कोणाचे समीकरण बिघडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोठ्या गटांबरोबरच काही स्थानिक नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामध्ये: सौ. सिताताई बनसोड, कपिल मस्के, दलित पँथरचे कार्यकर्ते या घटकांचा कल कोणत्या बाजूने झुकतो, यावर सत्तेची चावी अवलंबून राहणार आहे. सध्या केजचे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून, आरोप-प्रत्यारोप आणि रणनीती आखण्याला वेग आला आहे. केज नगरपंचायतीचा आगामी रणसंग्राम ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. युवा नेतृत्वाचा उत्साह आणि प्रस्थापितांचा अनुभव यांच्यातील ही थेट लढत केजच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलणार का, हे येणारा काळच ठरवेल.

COMMENTS