नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर तीव्र टीका क

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर तीव्र टीका करत केंद्र सरकारच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पश्चिम आशियात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी नागरिकांना इंधन, खाद्यतेल आणि आयात वस्तूंच्या वापरात बचत करण्याचे आवाहन केले होते. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर जनतेवर जबाबदारी ढकलण्याचा आरोप केला.
खा. राहुल गांधी यांनी सामाजिक माध्यमावर केलेल्या विस्तृत संदेशात म्हटले की, जनतेला सोने खरेदी टाळा, परदेश दौरे कमी करा, पेट्रोल-डिझेल जपून वापरा, खत आणि खाद्यतेलाची बचत करा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवा, घरातून काम करा, अशा सूचना देणे म्हणजे सरकारच्या अपयशाचे लक्षण आहे. त्यांच्या मते, गेल्या अनेक वर्षांच्या चुकीच्या धोरणांमुळे देश अशा स्थितीत पोहोचला असून आता सामान्य नागरिकांवर त्यागाची जबाबदारी टाकली जात आहे. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक वेळी संकट निर्माण झाल्यावर सरकार स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी नागरिकांना काटकसरीचा सल्ला देते. त्यामुळे शासनाच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न निर्माण होत असल्याची टीकाही त्यांनी केली. देशाला सक्षम नेतृत्वाची गरज असताना जनतेलाच सतत त्यागाची शिकवण दिली जात आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

COMMENTS