Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर पालिका राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजीमुळे ’विकास आघाडी’ रिचार्ज

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खच्चीकरणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत गटबाजीच कारणीभूत असल्याचे चित्र सद्या इस्लामप

माजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला आज सुरूवात
मोकळ्या जागेवर कर लावण्याच्या ठरावाचा तात्काळ अहवाल द्या; कराड पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना आयुक्तांचा दणका

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खच्चीकरणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत गटबाजीच कारणीभूत असल्याचे चित्र सद्या इस्लामपूर शहरात दिसत आहे. मंत्री जयंत पाटील यांच्या समर्थकांमध्ये अंतर निर्माण झाल्याने पक्षांतर्गत गटबाजी वाढली आहे. पालिका निवडणुकांत पक्षांतर्गत कटकारस्थानांचा फटका यापूर्वीच्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची होत असल्यामुळे शहरातील विकास आघाडी ‘रिचार्ज’ झाल्याचे दिसत आहे.
इस्लामपूर नगरपालिकेवर राष्ट्रवादीची अनेक वर्षे सत्ता कायम होती. कायम सत्ता राखलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला गत पालिका निवडणूकित सत्ता राखताना नाकीनऊ आले होते. विकास आघाडीचा वारू रोखताना राष्ट्रवादीला दमछाक होत आहे. माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील हे पूर्वी मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय होते. मात्र, गत पालिका निवडणूकित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी वरून यांच्यातील दरी वाढत गेली. राष्ट्रवादीला खमक्या नेतृत्वाची गरज आहे. बुधवारी पालिकेत मुख्याधिकारी दालनात राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे व माजी नगरसेवक पिरअली पुणेकर या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार घडला. या प्रकाराची इस्लामपूर शहरासह जिल्ह्यात जोरदार चर्चा झाली.
राष्ट्रवादीला पालिका राजकारणात खमके नेतृत्व असते तर असे प्रकार घडले नसते. यावरून पालिकेतील नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रवादीतील कोण सक्षम आहे, याचा ना. जयंत पाटील यांनी विचार करूनच निर्णय घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पालिका राजकारणात ना. जयंत पाटील यांना नेता मानणारे खूप आहेत. परंतू पालिकेतील राष्ट्रवादीचे नेतृत्व म्हणून कोणाला मानायचे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाचा फायदा नेहमीच विरोधी गटाला झाल्याचा इतिहास आहे. मात्र, राष्ट्रवादी बेरजेचे राजकारण करत पालिकेतील सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाली आहे. मंत्री पाटील यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे. तरी राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजी वेळीच रोखली नाही तर राष्ट्रवादीचे पानिपत होण्यास वेळ लागणार नाही. आगामी पालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षातील अंतर्गत वादावर ना. पाटील यांनी लवकर तोडगा काढण्याची गरज आहे, अशी सर्वसामान्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी आहे.
आगामी पालिका निवडणूकित विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ पाटील, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल महाडीक, भाजप कार्य समितीचे सदस्य सम्राट महाडीक, माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी नगरसेवक वैभव पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, माजी विरोधी पक्ष नेते विजय कुंभार यांनी पालिकेवर सत्ता आणण्यासाठी व्ह्यूव रचना आखण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत इस्लामपूर शहरातील राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजीमुळे विकास आघाडी रिचार्ज झाली आहे.

COMMENTS