Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण देशी चॅम्पियन्सच्या उपक्रमामुळे म्हसवडमध्ये जलतरण स्पर्धा; राज्यातील लोकांमध्ये आश्‍चर्य

म्हसवड / वार्ताहर : माण देशी चॅम्पियन्सच्या वतीने हनुमान जयंतीचे औचित्य साधुन म्हसवड येथील माण देशी क्रिडा संकुल येथे जलतरण स्पर्धेचे आयोजन केले

पोथीवाद आपल्या देशासमोरील मोठं आव्हान : आ. पृथ्वीराज चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 एप्रिल मोदीजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणून साजरा
मुलांच्या दिल्ली, ओरिसा, गुजरात; मुलींच्या हरियाणा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशचे संघ विजयी

म्हसवड / वार्ताहर : माण देशी चॅम्पियन्सच्या वतीने हनुमान जयंतीचे औचित्य साधुन म्हसवड येथील माण देशी क्रिडा संकुल येथे जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते. खरे तर माण तालुका हा संपूर्ण भारतात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. कारण माण तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे आणि येथे लोकांना पिण्याच्या पाण्याची ही कमतरता आहे. माण तालुका हा नेहमीच गुराची चारा छावणी दुष्काळ या साठी ओळखला जातो. अशा ठिकाणी जलतरण तलाव असणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे म्हसवड येथे झालेल्या जलतरण स्पर्धेचे राज्यभरातील लोकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या स्पर्धा सकाळी 10 वाजले पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू होत्या. या स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आली. या स्पर्धेसाठी संपूर्ण तालुक्यातून खेळाडूंनी हजेरी लावली होती. स्पर्धेमध्ये खालील खेळाडूंनी यश संपादन केले. 100 मीटर फ्री स्टाईल पोहणे मुलांचा गट या क्रिडा प्रकारात विशाल काळेल प्रथम क्रमांक, अजित काळेल द्वितीय क्रमांक, तुषार सावंत तृतीय क्रमांक तसेच 100 मीटर फ्री स्टाइल पोहणे मुलींचा गट या क्रिडा प्रकारात अपेक्षा काळेल प्रथम क्रमांक, अपेक्षा कारंडे द्वितीय क्रमांक व सायली ढेकळे तृतीय क्रमांक. 200 मीटर फ्री स्टाईल पोहणे मुले यामध्ये तुषार काळेल प्रथम क्रमांक, प्रफुल्ल काळेल द्वितीय क्रमांक व ओंकार काळेल तृतीय क्रमांक. 200 मीटर फ्री स्टाइल पोहणे मुली या क्रिडा प्रकारात सरस्वती काळेल प्रथम क्रमांक, अपेक्षा काळेल द्वितीय क्रमांक व गौरी खंदारे तृतीय क्रमांक. खुल्या गटामध्ये अनुजा ढेकळे प्रथम क्रमांक व भाग्यश्री शिंदे द्वितीय क्रमांक याचबरोबर 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक मुले या क्रिडा प्रकारात तुषार काळेल प्रथम क्रमांक विशाल काळेल द्वितीय क्रमांक व प्रफुल्ल काळेल तृतीय क्रमांक. 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मुली या क्रिडा प्रकारात अपेक्षा कारंडे प्रथम क्रमांक, अपेक्षा काळेल द्वितीय क्रमांक सरस्वती काळेल तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी खेळाडूंना माण देशी चॅम्पियन्सतर्फे मेडल प्रशिस्तीप्रत्रक व रोख रक्कम देण्यात आली. या स्पर्धेसाठी जवळपास तालुक्यातील 150 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची व पालकांची नाश्त्याची सोय माण देशी चॅम्पियन्सतर्फे करण्यात आली होती. यावेळी माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, अ‍ॅथलेटिक कोच कोंडीबा विरकर, धुळा कोळेकर, महालिंग खांडेकर, समाधान पाटील, सूरज काटकर, सुशांता आवळे व बानू बनगर आणि सर्व माण देशी चॅम्पियन्स स्टाफ उपस्थित होता.
म्हसवड : जलतरण तलावात सुरु असलेल्या स्पर्धेतील एक क्षण (छाया : अहमद मुल्ला)

COMMENTS