Homeताज्या बातम्यासंपादकीय

शिकवणी वर्ग आणि शिक्षणव्यवस्था

अलीकडच्या काही दशकांपासून शिकवणी वर्गाचे चांगलेच पेव फुटतांना दिसून आलेले आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना शाळेत ही पाठवायचे आणि दुसरीकडे त्याला चांगल

प्रदूषणाचे दिवाळे
काँगे्रसची दिशा आणि दशा !
राजकारणाचा उकीरडा

अलीकडच्या काही दशकांपासून शिकवणी वर्गाचे चांगलेच पेव फुटतांना दिसून आलेले आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना शाळेत ही पाठवायचे आणि दुसरीकडे त्याला चांगले मार्गदर्शन चांगले मार्क मिळावे, यासाठी शिकवणी वर्ग देखील लावायचे. यामुळे राजस्थानातील कोटा सारखे पॅटर्न तयार होत आहे, आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या देखील वाढतांना दिसून येत आहे. लहान मुलांना अभ्यासाला इतकं जुंपले जाते की, त्याच्यावर एकप्रकारचा मानसिक ताण तयार होतो आणि तो फुटतो. वास्तविक पाहता, विद्यार्थ्यांचा कल पाहून त्याला शिक्षण मिळायला हवे. आणि त्याच्यावरचा ताणही हलका व्हायला हवा. यादृष्टीने केंद्र सरकारने दहावीच्या खालील किंवा 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीस प्रवेश देण्यास मनाई केली आहे. खासगी शिकवण्यांसाठी केंद्र शासनाने नियमावली जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, विविध स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली वाढलेली खासगी शिकवण्यांची दुकानदारी आणि मनमानी कारभारावर अंकूश ठेवण्यासाठी केंद्राने शिकवण्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. यामुळे काही प्रमाणात शिकवणी वर्गांवर चाप बसणार आहे. मात्र राज्य सरकार आपल्या राज्यात या धोरणाला मान्यता देते का, हे देखील महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास महत्व असण्याऐवजी, त्याला फक्त एका परीक्षेच्या दृष्टीने लायक बनवण्याचे कारखाने या शिकवणी वर्गांनी सुरू केले आहे. ज्या देशाचे सैन्य शिक्षकांपेक्षा अधिक असते तो देश राजकीयदृष्ट्या दिवाळखोर मानला जातो. त्यामुळे देशात सर्वाधिक संख्या ही शिक्षकांची असावी याचे संकेत जगभरातील शासनव्यवस्था पाळत असतात. मात्र आपल्या देशात शिक्षकांची संख्या ही खूपच कमी आहे. शिवाय त्यांना नोकरीत सामावून घेतले जात नाही. परिणामी शिक्षक शिकवणी वर्ग सुरू करतात, आणि त्यातून अतिरिक्त नॉलेज देण्याचा प्रयत्न करतात. यातून शिकवणी वर्गांचे पेव फुटले आहे. भारतासारख्या देशात 50 टक्के मार्क असलेले अनेक विचारवंत आणि तज्ज्ञ होवून गेलेले आहे. त्यांनी कधी 90 टक्के मार्क घेतले नाही. त्यामुळे त्यांची बुद्धीमत्ता कमी आहे, असेही म्हणता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची खरी गरज आहे. तरच शिकवणी वर्गांचे पेव कमी होईल. ज्या शिक्षणामुळे सर्वसामान्य माणूस प्रतिकूल परिस्थितितून पुढे येवून आपल्या जीवनात बदल घडवून आणतो. त्या बदल घडविण्याच्या प्रक्रियेलाचा बाधा निर्माण करण्याचे काम शिकवणी वर्गांतून होतांना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना यंत्र बनवण्याचे काम शिकवणी वर्ग करतांना दिसून येत आहे. घोकंपट्टी, रट्टा मारणे, या बाबी यात होतांना दिसून येत आहे. शिवाय महागड्या शिकवणी, श्रीमंत वर्ग आपल्या पाल्यांना लावून देवू शकतात, मात्र इतर विद्यार्थ्यांचे काय हा महत्वाचा प्रश्‍न उरतोच. त्यामुळे शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाची गुणवत्ता, नवीन शिक्षणवियषक धोरण या कोणत्याही बाबींवर मुल्यात्मक चर्चा उभी रहात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शिक्षणाचे खाजगीकरण व्यापक होवून केवळ श्रीमंत आणि उच्च जातीयांसाठीच शिक्षण कसे उपलब्ध राहील यासाठीच संपूर्ण व्यवस्था झटतांना दिसत आहे. देशाच्या प्रगतीत तळागाळातून शिक्षणाच्या माध्यमातून पुढे आलेल्या समाजसमुहामुळेच देश जागतिकीकरणाच्या काळात महासत्तेसाठी दावाकरण्याची चर्चा करतो आहे. मात्र त्याच समाज समूहांना शिक्षणातून बाद करुन हा देश महासत्ता कसा बनू शकतो याचा सारासार विवेकही आता शिल्लक राहीलेला नाही. त्यामुळे शिक्षणाचे खासगीकरण थांबवण्याची गरज आहे, तरच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकेल. 

COMMENTS