Homeताज्या बातम्याराजकारण

केजरीवालांच्या याचिकेवर उद्या “सर्वोच्च”सुनावणी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली असून, त्यांचा जामीन देखी

शेतकरी आंदोलनाचा भडका
पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरणार
अबब…! दोन महिन्यात पुल खचला

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली असून, त्यांचा जामीन देखील फेटाळण्यात आला आहे. याविरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र ईडीने योग्य पुराव्याआधारे अटक केल्याचा दावा न्यायालयाने केल्यानंतर त्यांची अटक योग्य ठरवली होती. या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्याची सुनावणी उद्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
केजरीवाल यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. केजरीवाल यांची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी 10 एप्रिल रोजी सांगितले होते की, मुख्यमंत्र्यांच्या अटकेचा आधार अशी कागदपत्रे आहेत, ज्यांवर विश्‍वास ठेवता येत नाही. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले होते की, आम्हाला ईमेल करा मग बघू, त्यानंतर ही सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली आहे. वास्तविक, केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांना अटक आणि त्यानंतर तपास यंत्रणेच्या कोठडीत पाठवण्याबाबत याचिका दाखल केली होती. 9 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. वारंवार समन्स पाठवूनही केजरीवाल तपासात सहभागी झाले नाहीत, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) त्यांना अटक करण्याचा एकमेव पर्याय उरला होता. ईडीने आमच्यासमोर पुरेसे पुरावे सादर केले आहेत. मद्य घोटाळ्याचा पैसा गोवा निवडणुकीसाठी पाठवण्यात आल्याची विधाने आम्ही पाहिली. गेल्या 9 महिन्यांपासून ईडीकडे अशी विधाने होती, असे केजरीवाल म्हणाले होते. असे असतानाही लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली. निवडणुकीच्या वेळेचा विचार न करता अटक आणि रिमांडची चौकशी कायद्यानुसार केली जाईल, असे न्यायालयाने सांगितले होते.

COMMENTS