Homeताज्या बातम्या

पोटच्या पोरीनच आईला संपवलं.

प्रियकरासोबत लग्न करण्यास विरोध केल्याने मुलीने आईची केली हत्या

 गडचिरोली प्रतिनिधी-  गडचिरोली(Gadchiroli) जिल्ह्यात एक थरारक हत्येची घटना समोर आली. आईने मुलीला  प्रियकरासोबत लग्न करण्यात विरोध केला होता. दुसर

’लिव्ह इन’चा हट्ट धरणार्‍या तरुणीची हत्या
औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती ! बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला भररस्त्यात संपवलं
पंजाबमध्ये आप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

 गडचिरोली प्रतिनिधी-  गडचिरोली(Gadchiroli) जिल्ह्यात एक थरारक हत्येची घटना समोर आली. आईने मुलीला  प्रियकरासोबत लग्न करण्यात विरोध केला होता. दुसरं म्हणजे अनुकंपा तत्वावर मुलीला नोकरी मिळणार होती. ती नोकरी स्वीकारू नको, असं आईचं म्हणण होतं. यावरून मुलीचे आईसोबत वाद होत होते. यामुळे मुलीने प्रियकराच्या मदतीनं आईची हत्या करण्याचा कट रचला. निर्दयी मुलने हत्या केल्यानंतर आईचा मृतदेह कुठं फेकायचा. यासाठी ते फिरत होते. तेवढ्यात पोलिसांची नजर त्यांच्यावर पडली आणि पोलिसांनी तिला अटक केली. तेव्हा हे प्रकरण समोर आले. या घटनेनं गडचिरोली जिल्हा हादरला. मुलगी एवढी निर्दयी कशी झाली असेल, असा प्रश्न या घटनेनं निर्माण झाला. उर्मिला चंद्रकांत आत्राम असं या निर्दयी मुलीचं नाव आहे. 

COMMENTS