Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कला केंद्रातील नर्तिकेचा लॉजवर खून करून प्रेताची विल्हेवाट !

सहा जणांविरुद्ध खून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील केज-बीड रोडवर असलेल्या एका कला केंद्रात काम करीत असलेल्या नर्तिकेचा तिला लॉजवर नेऊन तिच्या गळ्यावर धारदार शस्त्रा

चारित्र्यावर संशय घेत पतीने केला पत्नीचा खून
चित्रपट पाहून सायको किलरने केल्या 4 सुरक्षारक्षकांच्या हत्या
जमीन विक्रीच्या वादातून तरुणाचा खून

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील केज-बीड रोडवर असलेल्या एका कला केंद्रात काम करीत असलेल्या नर्तिकेचा तिला लॉजवर नेऊन तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून व नाक तोंड दाबून खून झाला. मात्र सदर प्रकरणी पोलिसांना माहिती न देता मयत महिलेच्या नातेवाईकांना भीती दाखवून गुपचूप प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला. अडीच महिन्या नंतर या खुनाला वाचा फुटली आहे. मयताच्या आईच्या फिर्यादी वरून खून करून पुरावा नष्ट करणे व धमकी दिल्याचा प्रकरणी खून करणार्‍या सह त्याला मदत केल्या प्रकरणी केंद्राचे मालक, मॅनेजर, लॉजचा मॅनेजर यांच्यासह सहा जणांविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परभणी जिल्ह्यातील वांगी ह. मु. शेलगाव ता. अर्धापूर जि. नांदेड येथील 55 वर्षीय अनुसूचित जातीची महिला ही तिच्या दोन मुलीसह केज-बीड रोडवरील ढाकणे यांच्या रेणुका कला केंद्रात संगीत बारीत नाचकाम करून उपजीविका करीत होत्या. त्याची मुलगी शितल हिचे लग्न झालेले होते व ती गरोदर असताना तिचा नवरा बाबुराव राजू गोरे याचे कोरोनाने निधन झाले होते. तिला त्याच्यापासून एक 4 वर्षाचा मुलगा आहे.शितल व त्यांच्या पार्टी सोबत रेणुका कला केंद्राचे मालक रामनाथ ढाकणे यांच्यात करार झाला होता. त्यांनी ढाकणे यांच्या कडून पाच लाख रु. उचल घेतली आहे. शितल ही या कला केंद्रावर नृत्य करीत असल्याने तिची ओळख हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस येथील गजानन उर्फ गज्जू कराळे याच्या सोबत ओळख झालली होती. गजानन उर्फ गजु हा अधुन मधुन शितल हिला भेटण्यासाठी रेणुका कलाकेंद्र येथे येत होता. भेटण्यासाठी येताना तो मुलगी शितल हीस किराणा सामान, तसेच मुलगी शितल हिचा मुलगा परशुराम यास देखील खाऊ आणत होता. त्यातुन मुलगी शितल व गजानन उर्फ गजु याची जवळीक झाली होती. गजानन उर्फ गजु कराळे हा रेणुका कलाकेंद्र येथे आल्या नंतर तो शितल हीस बरड फाटा येथील भाजपचे मुरलीबप्पा ढाकणे यांचे राजयोग लॉजवर तिला घेऊन जात असे व तिला लॉजवर घेऊन जाण्यासाठी तो कलाकेंद्र मालक रामनाथ ढाकणे यांना 3 हजार 100रु. देत असे. गजानन याने शितल हिस रेणुका कलाकेंद्र येथे, मालक रामनाथ ढाकणे यांना उचलीचे पैसे देवुन तिला कायमस्वरुपी घेवुन जाईल असे सांगीतले होते. त्या पोटी गजानन उर्फ गजु याने रामनाथ ढाकणे यांना मागील वर्षी डिसेंबर 2022 मधे 1 लाख 20 हजार रु.चा चेक देखील दिला होता. गजानन हा त्याचा मित्र घुगे याचे सोबत रेणुका कलाकेंद्र येथे येत होता. गजानन उर्फ गजु यास शितल हिचे इतर लोकां सोबत देखील अनैतिक संबंध असल्याचा संशय यायला लागला होता. त्यातुन एकदा गजानन कराळे व त्याचा मित्र घुगे साहेब असे रेणुका कलाकेंद्र येथे आले तेव्हा मुलगी शितल व गजानन कराळे या दोघात शाब्दिक बाचाबाची झाली होती.त्या नंतर सुमारे सव्वा दोन महिन्या पूर्वी अमावस्येच्या दिवशी रात्री 1:30 वा च्या सुमारास गज्जू उर्फ गजानन कराळे हा गणेश ढाकणे यांच्या गाडीतून शितलला रेणुका कला केंद्रातून घेऊन राजयोग लॉजवर गेला. शितल ही सकाळी ती परत आली नाही म्हणून तिच्या आईने गणेश ढाकणे यांच्या वडिलांकडे चौकशी केली असता तिचे आटोपले नसल्याने ती लवकर येईल असे सांगितले. त्या नंतर 9:30 च्या दरम्यान याच कला केंद्रावर काम करणारी शमीम भाबी हिने शितलच्या आईला व मोठ्या बहिणीला सोबत घेऊन गणेश ढाकणे यांच्या सोबत राजयोग लॉजवर गेली आणि त्यांनी वरच्या मजल्यावर रूममध्ये जाऊन पाहिले असता शितल ही पलंगावर मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर कंठस्थानी शदत्राचा वार करण्यात येऊन तिचा खून झालेला होता. या बाबत त्यांनी लॉजचे मॅनेजर राठोड यांच्याकडे चौकशी केली असता शितल सोबत लॉजवर मुक्कामी असलेला गज्जू उर्फ गजानन कराळे हा पहाटे टूथ पेस्ट आणण्याच्या बहाण्याने मॅनेजरच्या मोटार सायकल घेऊन फरार झाला असल्याचे समजले. त्या नंतर मयत शितलची आई व बहिणीने पोलिसाना माहिती देण्याचे म्हणताच तिच्या हातातील मोबाईल शमीम भाबी हिने हिसकावून घेतला आणि पोलिसात तक्रार दिल्यास तक्रार दिल्यास तुम्हाला त्रास होईल व तुम्ही जेलात जाल. अशी धमकी दिली. मयत शितल हिची आई व बहीण अशिक्षित असल्याने त्या घाबरून गेल्या त्या नंतर गणेश ढाकणे याचे चारचाकी वाहनात शितल हिचे प्रेत शालीत गुंडाळुन रामनाथ ढाकणे, राठोड, वसुदेव सारूक यांनी टाकले. त्यानंतर प्रेत घेवुन मयत शितलची आई, बहीण, तिचा लहान मुलगा यांना सोबत घेऊन शमिम भाभी, गणेश ढाकणे, कला केंद्र मालक रामनाथ ढाकणे यांनी परभणी जिल्ह्यातील त्यांच्या गावी वांगी येथे गेले आणि तिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करून खुनाचा पुरावा नष्ट केला.15 दिवसा नंतर शितलच्या आईने पुन्हा पोलिसात तक्रार देण्याची ईच्छा व्यक्त करताच ही घटना कोणाला सांगू नका. असे म्हणून त्यांना धमकी देण्यात आली. तसेच शितल हिला चक्कर आल्याने ती कपाटवर पडून तिचा मृत्यू झाला अशी खोटी माहिती शितलच्या गावी नातेवाईकांना दिली. तब्बल सव्वा दोन महिन्या नंतर मयत शितल हिच्या आईने सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्या नंतर दि. 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 3:00 रेणुका कला केंद्रातील नृत्यांगना शितल हिला राजयोग लॉजवर नेऊन तिचा भोकसून व नाक तोंड दाबुन खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गज्जू उर्फ गजानन शिवराम कराळे (रा. डिग्रज जि. हिंगोली), रामनाथ ढाकणे, (रा. सारूळ ता. केज), शमिम भाभी, (रा. परभणी), वासुदेव सारूक (रा.जोला ता. केज), लॉजचा मॅनेजर राठोड ( रा. वसमत जि. हिंगोली) आणि घुगे ( रा. परभणी ) या सहा जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. 503/2023 भा. दं. वि. 302, 301, 120 (ब), 212, 370, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार हे पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS