Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड पालिकेकडून वसुली विभागाचा कारवाईचा धडाका

कराड / प्रतिनिधी : येथील नगरपालिकेने सन 2021-22 अखेरची थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी कर वसुली विभागामार्फत वसुलीचे काम जोरात सुरु असुन नगरपा

तहसीलदारांची राजपथ इन्फ्रावर धडक कारवाई: आठ कोटी रॉयल्टी थकविल्याने वाहनांसह मशिनरी सील
वन हदीतील लेंडीखत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार l LokNews24
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान; बिल्डरसह डेव्हलपरना 3 वर्ष कारावासासह दंडाची शिक्षा

कराड / प्रतिनिधी : येथील नगरपालिकेने सन 2021-22 अखेरची थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी कर वसुली विभागामार्फत वसुलीचे काम जोरात सुरु असुन नगरपालिका कर वसुली विभागाने कारवाई करीत थकीत घरपट्टी व पाणीपट्टी असलेल्या 2 मिळकती सील केल्या असून 7 मिळकतीचे नळ कनेक्शन कट केले आहेत.
त्यासाठी पालिकेन 11 पेठा व हद्दी बाहेर साठी 2 पथके तयार केली आहेत. त्यामध्ये पथक क्र. 1 मध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवार पथक क्र. 2 मध्ये शनिवार -1, शनिवार 2, शनिवार 3, रविवार, ग्रामीण 1, ग्रामीण 2 अशी पथके तयार केली असून त्याप्रमाणे वसुलीचे कामकाज व कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी तथा प्रशासक रमाकांत डाके यांनी दिले आहेत.
कर वसुली विभागाने मिळकतधारकांना कर वेळेत भरण्यासाठी वारंवार मिळकतधारकांना सुचना दिल्या होत्या. तरीही अद्याप ज्या मिळकतधारकांनी कर भरलेला नाही. अशा मिळकतधारकांवर कारवाई सुरु केली आहे. सन 2021-22 नगरपालिकेची घरपट्टीची एकूण थकबाकी मागणी 6 कोटी 52 लाख 16 हजार असून आजअखेर घरपट्टीची एकूण वसुली 48 लाख 49 हजार झालेली असून अद्याप 6 कोटी 03 लाख 67 हजार इतकी येणेबाकी वसुली करणेची आहे. पाणीपट्टीची एकूण थकबाकी मागणी 2 कोटी 37 लाख 98 हजार असून आजअखेर पाणीपट्टीची एकूण वसुली 17 लाख 49 हजार इतकी वसुली झालेली असून अद्याप 2 कोटी 20 लाख 49 हजार इतकी येणेबाकी वसुली करणेची आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची एकूण येणेबाकी 8 कोटी 24 लाख 16 हजार इतकी रक्कम येणेबाकी आहे.

COMMENTS