Homeताज्या बातम्या

मतपत्रिकेमुळे पंजाबमध्ये ‘कमळ’ कोमेजले; निकालही बदलले : प्रकाश आंबेडकर यांचा दावा

नुकत्याच जाहीर झालेल्या पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांनी देशातील मतदान प्रक्रियेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण क

मतदान सक्तीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
पश्‍चिम बंगालमध्ये निवडणूक निरीक्षक ओलीस; अन्न-पाण्याविना अडकले अधिकारी; सर्वोच्च न्यायालयाचा संताप
पळवापळवीतून सत्तेचे व्यवस्थापन करणे हा जनताद्रोहच!
प्रकाश आंबेडकर : वंचितचा सर्वच्या सर्व जागांवर पराभव, काय आहेत कारणं? - BBC  News मराठी

नुकत्याच जाहीर झालेल्या पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांनी देशातील मतदान प्रक्रियेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या निवडणुका ईव्हीएम (EVM) ऐवजी मतपत्रिकेद्वारे (बॅलट पेपर) झाल्या, ज्यामध्ये सत्ताधारी भाजपला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. “पंजाबमध्ये कमळ का फुलले नाही? कारण तिथे निवडणुका ईव्हीएमवर नाही तर मतपत्रिकेवर झाल्या,” असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी एक सविस्तर पोस्ट शेअर करत ईव्हीएम आणि ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम विरोधातील लढा अधिक मजबूत करण्याचे आवाहन देशवासीयांना आणि विरोधी पक्षांना केले आहे.

पंजाबमधील एकूण १,९७७ प्रभागांपैकी भाजपला केवळ १७२ जागांवर विजय मिळवता आला. म्हणजेच भाजपला एकूण जागांच्या १० टक्क्यांहून कमी जागा मिळाल्या. विशेष म्हणजे, कोणत्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा नसलेल्या अपक्ष उमेदवारांनी २५१ जागा जिंकून भाजपपेक्षा ७९ जागा अधिक मिळवल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत ईव्हीएमवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली आहे. मात्र, पंजाबमध्ये मतपत्रिकेद्वारे निवडणूक होताच भाजपचा झालेला पराभव ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर आणि पारदर्शकतेवर शंका उपस्थित करणारा ठरला आहे, असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात आहे.

प्रकाश आंबेडकरांचा न्यायालयाद्वारे थेट लढा

प्रकाश आंबेडकर गेल्या अनेक दशकांपासून ईव्हीएम विरोधात रस्त्यावरील आंदोलनांपासून ते थेट न्यायालयापर्यंत कायदेशीर लढाई लढत आहेत. केवळ वृत्तपत्रांत लेख लिहिणे किंवा माध्यमांसमोर विधाने करण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी या विषयावर ठोस कायदेशीर पावले उचलली आहेत.

नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांनी निवडणूक आयोग आणि प्रशासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. सन २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात कथितपणे वाढलेल्या सुमारे ७६ लाख अतिरिक्त मतांच्या गंभीर मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला, तसेच प्रशासनाला धारेवर धरले आहे.

COMMENTS