Homeताज्या बातम्या

गुरुपौर्णिमेनिमित्त बीडमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे कृतज्ञता सोहळा

बीड : आर्ट ऑफ लिव्हिंग, बीडच्या वतीने गुरुपौर्णिमेचा पावन उत्सव भक्ती, कृतज्ञता आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख

गोदरी ते पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळाचे दत्त संस्थान, बालाघाट येथे उत्स्फूर्त स्वागतवारकर्‍यांसाठी नाश्ता व प्रसादाची सेवा
साधुसंतांच्या आशीर्वादाने नव्या जबाबदारीची सुरुवात : आ. कोल्हे
मंदिर उभारणीस आज शुभारंभ; रामनामाच्या गजरात कोरीव शिलांची उभारणी सुरू होणार


बीड : आर्ट ऑफ लिव्हिंग, बीडच्या वतीने गुरुपौर्णिमेचा पावन उत्सव भक्ती, कृतज्ञता आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व शिक्षक, स्वयंसेवक व साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी सद्गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या मानवकल्याणासाठीच्या कार्याचा गौरव करण्यात आला. श्वसन, ध्यान, सुदर्शन क्रिया आणि सेवाभावाच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत तणावमुक्त, हिंसामुक्त आणि आनंदी समाज घडविण्याचे त्यांचे ध्येय प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी आपल्या मनोगतात गुरुदेवांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी दिलेला तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाजाचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने त्यांच्या शिकवणुकीचा अंगीकार करून स्वतःच्या जीवनात शांतता, आनंद आणि समाजसेवेची भावना रुजवावी, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सामूहिक ध्यान, प्रार्थना आणि गुरुवंदनेद्वारे उपस्थितांनी गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग, बीडतर्फे आयोजित ‘हॅपिनेस प्रोग्राम (सुदर्शन क्रिया)’ या विशेष अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम 5 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत दररोज सकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, अमन प्लाझा, बार्शी रोड, बीड येथे होणार आहे.

COMMENTS